Indian Army Rescue Video : भारतीय जवानांची पुन्हा थरारक कामगिरी, बुडणाऱ्या मुलींना वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

भारतीय सैन्याच्या साहसाचा आणि चतूर कौशल्याचा असाच एक व्हिडिओ (Indian Army Video) सध्या समोर आला आहे. नदीत बुडणाऱ्या दोन मुलींना वाचवतानाचा हा थरार पाहून तुम्हीही अवाक राहाल. कारण हा पाहण्यातला थरार आता चांगलाच चर्चेत आहे.

Indian Army Rescue Video : भारतीय जवानांची पुन्हा थरारक कामगिरी, बुडणाऱ्या मुलींना वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
बुडणाऱ्या मुलींना वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 12:17 AM

ऋषिकेश : भारतीय सैन्याने (Indian Army) आपल्या चमकदार कामगिरीने आपले डोळे अनेकदा दिपवले आहे. भारतीय सैन्याच्या धाडसाचे आणि दमदार कामगिरीचे जगभर कौतुक होत असते. जगातील उत्तम सैन्यापैकी एक म्हणून भारतीय सैन्याकडे पाहिले जाते. भारतीय सैन्य सीमेवर तर (Border Security Force) आपले कर्तव्य चोख बजावून आपल्याला सुरक्षित ठेवत आहेच. मात्र भारतीय सैनिक नागरिकांच्या प्रती असलेले दायित्वही तेवढ्याच सचोटीने निभावत आहे. याचा प्रत्येय पुन्हा एकदा आदा आला आहे. भारतीय सैन्याच्या साहसाचा आणि चतूर कौशल्याचा असाच एक व्हिडिओ (Indian Army Video) सध्या समोर आला आहे. नदीत बुडणाऱ्या दोन मुलींना वाचवतानाचा हा थरार पाहून तुम्हीही अवाक राहाल. कारण हा पाहण्यातला थरार आता चांगलाच चर्चेत आहे. या थराराचा व्हिडिओही समोर आला आहे.’

ऋषिकेशमधील सैन्याच्या साहसाचा व्हिडिओ

ऋषिकेशमधील फूल छत्ती येथे आज भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने दोन मुलींची बुडताना वाचवत सुखरूप सुटका केली. या मुली नागरिकांच्या तराफ्यावरून पडल्या आणि थेट नदीत वाहून जाऊ लागल्या यांना वेळीच बाहेर काढलं नसतं तर या बुडाल्या असल्या आणि भलताच अनर्थ घडला असता, अशी माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

या मुली पाण्यात पडल्यावर वेगाने वाहून जाताना या व्हिडिओत दिसत आहे. यावेळी तातडीने जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. सुरूवातील या मुलींनी रशी टाकून बाहेर काढण्याच प्रयत्न करतान जवान या व्हिडिओतून दिसून येत आहे. मात्र यावेळी पाण्याचा वेगही जास्त आहे. त्यामुळे या मुलींना पाण्यावर तरंगणेही कठीण होऊन बसले आहे. या व्हिडिओत या मुलींनी सेफ्टी जॅकेट घातलेलेही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पाणयावर तरंगण्यास काही वेळ तरी मदत झाली. बराच प्रयत्न करूनही या मुलींना दोर पकडणे शक्य झाले नाही. त्यानंतर जवान लगेच पाण्यात उतरले आणि तात्काळ या मुलींना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्या सध्या सुखरूप आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.