देशाची शान तिरंग्याचा जगभरात डंका; ‘हा’ Viral video पाहा, अभिमानानं छाती फुलेल
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात रणकंदन सुरू आहे. हे युद्ध (War) थांबायाचे नाव घेत नाही. रशिया हा भारताचा जुना मित्रदेश आहे. युद्धादरम्यानही रशियाने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सहाय्यच केले. आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो यासंबंधी आहे.
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात रणकंदन सुरू आहे. हे युद्ध (War) थांबायाचे नाव घेत नाही. आज युद्धाचा 13वा दिवस आहे. मात्र, घनघोर धुमश्चक्री सुरूय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यात फोनवरून 35 मिनिटेच चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही जवळपास 50 मिनिटे चर्चा केली. मोदींनी या दोन्ही देशांशी चर्चा करून युद्धावर तोडगा काढण्याचे आवाहन केले. रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा आणि जुना मित्रदेश आहे. युद्धादरम्यानही रशियाने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारताला सहाय्यच केले. एकूणच रशियाचे भारताशी असलेले घट्ट मैत्रीचे नातेच यातून दिसून येते. आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो यासंबंधी आहे.
तिरंग्याचा मान
व्हायरल व्हिडिओचा दाखला देत एका यूट्यूबर क्रिएटरने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. रशियानं सॅलेटाइट रॉकेट लॉन्च करण्याचे ठरवले. यावेळी त्या रॉकेटवर काही देशांचे ध्वज होते. मात्र या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पवित्रा घेतला, की हे रॉकेट काही देशांचा ध्वज काढूनच लॉन्च केले जाईल. रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी एक व्हिडिओ जारी केला. बैकनूरमधले रॉकेट काही देशांच्या झेंड्याशिवाय लॉन्च होईल, असे ते म्हणाले. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की इतर देशांचे झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. मात्र भारताचा तिरंगा तिथे दिसत आहे.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर एटू मोटिव्हेशन अरविंद अरोरा (A2 Motivation {Arvind Arora}) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. ‘देश की शान तिरंगेका बज रहा पूरी दुनिया मे डंका’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. 7 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत आहेत. एकाच दिवसात 1.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. (Video courtesy – A2 Motivation {Arvind Arora})