AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Funny desi jugaad : असे खतरनाक देसी जुगाड पाहिलेत का? हसून हसून पोट दुखेल

Indian funny desi jugaad : सोशल मीडिया (Social Media) विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी (Funny) व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा(Jugaad)चे व्हिडिओ. काही जुगाड एकत्र केलेला हा व्हिडिओ पाहा...

Funny desi jugaad : असे खतरनाक देसी जुगाड पाहिलेत का? हसून हसून पोट दुखेल
व्हायरल झालेले देसी जुगाड
| Updated on: Feb 07, 2022 | 8:30 AM
Share

Indian funny desi jugaad : सोशल मीडिया (Social Media) विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी (Funny) व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा(Jugaad)चे व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात. माणसांसह प्राण्यांचे जुगाडाचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. अशा व्हिडिओंचे व्ह्यूजही प्रचंड असतात. ते वेगात व्हायरल होतात. आता आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. भारतीय लोक जुगाड करण्यात माहीर असतात. त्यातलेच काही जुगाड यात दाखवले आहेत. हे जुगाड भन्नाट असून ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवार राहणार नाही. काही जुगाड एकत्र करून हा छोटा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

जुगाडांचा बंच

व्हिडिओत तुम्हाल दिसून येईल, की पहिल्या फ्रेममध्ये दोन खोल्यांच्या मध्ये दरवाजावर एक मोठं छिद्र पाडलं आहे. त्या छिद्रामध्ये एसी मधोमध बसवलाय. दोन्हीही खोल्यांत एसीचा प्रभाव असावा, म्हणून हा अनोखा जुगाड केलाय. दुसऱ्या फ्रेममध्ये एका घोडागाडीला कारचा आकार दिलाय. समोर घोडा दिसतोय आणि मागच्या बाजुला कार. तिसऱ्या फ्रेममध्ये सायकल रिक्षा दिसतेय. त्यात एक महिला बसलीय. सर्व बाजुंनी झाकलंय, छत्रीही घेतलीय कारण पाऊस पडतोय. पुढच्या फ्रेममध्ये एका गाठोड्याला कुलूप लावलं आहे. तर शेवटच्या फ्रेममध्ये बाटलीचं घर दिसतंय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मि. फॅक्टोपिया (Mr. Factopiya) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडिओ लाइक करत आहेत. तसंच यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत. भारत के देशी जुगाड़ || Indian funny desi jugaad असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. (Video Courtesy – Mr. Factopiya)

तंदूरी ऑम्लेटचा तडका, अंग अंग भडका..! दिल्लीच्या या काकांनी बनवलीय अजबच रेसिपी, Video Viral

Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते…

Accident Video Viral : अपघाताचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळणार नाही की चूक कोणाची?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.