मुंबईचं पोरंग ‘या’ देशाचा झाला जावई, बाप झाल्यावर खात्यावर आला ‘पैसाच पैसा’
लिसाला रशियन भाषा येत होती, तर मिथिलेश इंग्रजी बोलत होता आणि लिहितही होता. त्या दरम्यान त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्यानंतर मिथिलेशने लिसाला त्याने प्रप्रोज केले होते.
नवी दिल्लीः मुंबईमध्ये राहणारा आणि ट्रव्हल ब्लॉगर असणाऱ्या मिथिलेशने बेलारूसच्या लिसाबरोबर लव्ह मॅरेज केले आहे. या दोघांनी लग्नानंतर बेलारूसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या विवाहानंतर लिसाने एका मुलाला तिने जन्म दिला आहे. त्यानंतर मिथिलेश आपल्या मुलाचा व्हिडीओ बनवून त्याने तो व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून सगळ्यांना आपल्याला दीड लाख रुपये मिळाल्याचंही त्याने सांगितले.
मिथिलेश आपल्या बाळाच्या जन्मानंतर बेलारुस सरकारने आपल्याला एक मोठी रक्कम दिली आहे. मुलाच्या संगोपणासाठी बेलारूस सरकार बाळाच्या पालकांना खर्चासाठी पैसे देते. मिथिलेशवर जेव्हा वडिल म्हणून जबाबदारी आली तेव्हा सुरुवातीला त्यांना 1 लाख 28 हजार रुपये मिळाले.
View this post on Instagram
बेलारुस सरकारने बाळाच्या संगोपणासाठी त्यांनी 1 लाख 28 हजार रुपये दिल्याचे सांगितल्या नंतर मिथिलेशने पालकांना बेलारुस सरकारची आणखी एक आनंदाची गोष्ट सांगितली.
बेलारुस सरकार आता दर महिन्याला त्यांना 18000 देणार आहेत. आणि हे पैसे सरकारकडून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. मात्र हे पैसे त्यांना बेलारुसमध्ये राहिले तरच मिळणार आहेत.
मिथिलेशने आपली पत्नी लिसाची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, त्यावेळी त्यांचे बाळ किमान चार किलोग्रॅमचे होते. तर आता त्यांचे हे बाळ 2 महिन्याचे झाले आहे.
तर मिथिलेशने आपल्या बाळाचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. त्यामध्ये मिथिलेशचे वडिलही दिसत आहे. जे त्यांच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर भारतातून ते बेलारुसला गेले आहेत.
मिथिलेशचे Mithilesh Backpacker या नावाचे त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे. तर त्या चॅनेलवर त्याचे 9 लाखापेक्षा जास्त त्याचे सब्सक्राइबर्स आहेत. त्या चॅनेलवर तो आपल्या रोजच्या जगण्यातील वेगवेगळ्या क्षणांचे व्हिडीओ तो शेअर करतो.
तर त्याने एका व्हिडीओमध्ये आपली लव्हस्टोरीही सांगितली होती. मिथिलेशने आपल्या त्या एका व्हिडीओमध्ये सांगतो की मार्च 2021 मध्ये मी पहिल्यांदा बेलारुसला गेलो होतो.
त्यावेळी त्याच्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तो लिसाला पहिल्यांदा भेटला होता. त्यांची पहिली भेट ही ट्रान्सलेटर म्हणूनच झाली होती. क
कारण लिसाला रशियन भाषा येत होती, तर मिथिलेश इंग्रजी बोलत होता आणि लिहितही होता. त्या दरम्यान त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्यानंतर मिथिलेशने लिसाला त्याने प्रप्रोज केले होते. त्यानंतर लिसानेही त्याच्या प्रेमाला होकार दिला आणि 25 मार्च रोजी त्या दोघांनी लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबही उपस्थित होती.