AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसं ती माणसं जनावरही तसंच ! नेपाळी वाघिणीच्या प्रेमात भारतीय वाघानं रक्ताच्या बछड्याला संपवलं

बिहारमधील वाल्मिकी टायगर रझर्व्ह पार्कमध्ये एका आठ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचा अंदाज बांधला जात होता. दरम्यान, वाघाच्या बछड्याच्या मुत्यृमागचे नेमके कारण आता समोर आले आहे.

माणसं ती माणसं जनावरही तसंच ! नेपाळी वाघिणीच्या प्रेमात भारतीय वाघानं रक्ताच्या बछड्याला संपवलं
TIGER
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:19 AM

पाटणा : बिहारमधील वाल्मिकी टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये एका आठ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचा अंदाज बांधला जात होता. दरम्यान, वाघाच्या बछड्याच्या मुत्यृमागचे नेमके कारण आता समोर आले आहे. एका नेपाळी वाघिणीसोबत मेटिंग (समागम) दरम्यान हा बछडा अडचण ठरत असल्यामुळे भारतीय वाघानेच त्याचा फडशा पाडला आहे. तशी माहिती वनसंरक्षक हेमकांत राय यांनी दिलीय.

नेमकं काय घडलं होतं ?

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी वाघीण आणि भारतीय वाघ यांच्यात मेटिंग होत होतं. या मेटिंगदरम्यान आठ महिन्याचा एक मादा बछडा बाधा ठरत होता. या सातत्याच्या अडथळल्यामुळे भारतीय वाघाने त्याचा फडशा पाडला. या बछड्याचा मृत्यू कालेश्वर मंदिर परिसरातील कंपाऊंड नंबर टी-1 येथे झाला होता. हा भाग सोनहा नदीच्या किनाऱ्यावर आहे. सोनहा नदी भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर आहे.

वनसंरक्षकांनी काय सांगितलं ?

बिहारमधील वाल्मिकी टायगर रिझर्व्हमधील बछड्याच्या मृत्यूबाबत येथील वनसंरक्षक हेमाकांत राय यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन किंवा चार जानेवारी रोजी या भागात एक वाघीण दिसली होती. ही वाघीण नेपाळची होती. याच भागात एका भारतीय वाघसुद्धा दिसला होता. नेपाळची वाघीण आणि भारताचा वाघ यांच्यात मेटिंग होत होतं. मात्र बछडा त्यांना अडचण ठरत होता. याच कारणामुळे रागात येऊन वाघाणे बछड्याला मारून टाकलं. मृत्यू झालेला बछडा अवघा आठ महिन्यांचा होता. या बछड्याचे दुधाचे दातदेखील तुटलेले नव्हते. नंतर वाघीण नेपाळमध्ये परत गेली.

तीन वाघांचा मृत्यू झाला

यापूर्वी 31 जानेवारी 2021 रोजी व्हीटीआरच्या गोबरधन वन परिक्षेत्रात वाघाचे शव सापडले होते. वर्चस्वाच्या लढाईत एका वाघाने दुसऱ्या वाघिणीला मारले होत. 13 ऑक्टोबर रोजी व्हीटीआर या भागात आणखी एका वाघाचा मृतदेह सापडला होता. दोन वाघांतील हाणामारीमुळेच याही वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर  वर्षाच्या शेवटी म्हणजेच 12 डिसेंबर 2021 रोजी वाघिणीचा मृतदेह आढळला होता. टीव्ही 9 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इतर बातम्या :

Viral Video : वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेणाऱ्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, काय केलं असं? पाहा व्हिडिओ

Viral Video : थंडीपासून वाचण्यासाठी बाइकस्वाराचं देसी जुगाड! यूझर्स म्हणतायत, टॅलेंट भारताबाहेर जायला नको…

कतरिना, करीना हिच्यापुढं सगळ्या फिक्या, अस्सल अहिराणी गाण्यावरचा 20 सेकंदाचा हा Video पुन्हा पुन्हा पहाल

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.