AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा

'पुष्पा : द राइज' (Pushpa The Rise) या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळतेय. म्हणून मग रील्स बनवले जात आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. आता सिनेमा पाहून काहींनी चक्क गुन्हा केलाय. याच संबंधीचं एका आयपीएस अधिकाऱ्याचं ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा
रक्तचंदन तस्कराला पोलिसांनी केली अटक
| Updated on: Feb 04, 2022 | 2:24 PM
Share

Red Sandalwood Smuggler Arrested : ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळतेय. म्हणून मग रील्स बनवले जात आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. आता सिनेमा पाहून काहींनी चक्क गुन्हा केलाय. याच संबंधीचं एका आयपीएस अधिकाऱ्याचं ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. लाल चंदन तस्कर (Red Sandalwood Smuggler) पकडल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की पुष्पा रील लाइफमध्ये झुकणार नाही, पण रिअल लाइफमध्ये मात्र झुकणार आणि पकडलाही जाणार आता त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी प्रतिक्रियांचा पाऊसच पाडलाय. आम्ही बोलत आहोत यूपीच्या शामली जिल्ह्यातील एसपी सुकीर्ती माधव मिश्रा (SP Shamli Sukirti Madhav Mishra) यांच्याबद्दल. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. ‘पुष्पा’ रील लाइफमध्ये झुकणार नाही, तर रिअल लाइफमध्ये आता ‘पुष्पा’ झुकेल आणि पराभूतही होईल.

काय होतं ट्विटमागचं कारण?

नुकतंच महाराष्ट्र पोलिसांनी लाल चंदनाच्या तस्करीत सहभागी असलेल्या तस्करांना अटक केली आहे. हे तस्कर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात आलं. तस्करांनी ट्रकमध्ये लाल चंदन तर ठेवलंच होतं. मात्र याशिवाय अनेक फळांच्या पेट्याही वर ठेवल्या होत्या. ट्रकच्या वर कोरोना अत्यावश्यक उत्पादनांचं स्टिकरही लावण्यात आलं होतं. म्हणजेच पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याची पूर्ण तयारी होती.

नाकाबंदी करून जप्त केला ट्रक

पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती, त्यामुळे नाकाबंदी करून ट्रक जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली. पकडलेल्या याच आरोपीचा फोटो शेअर करत एसपी सुकीर्ती माधव मिश्रा यांनी एक ट्विट केलं आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.

‘बिचारी पुष्पा’

आयएएस अवनीश शरण यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘बिचारी पुष्पा.’ आणखी एका यूझरनं सांगितलं, की त्यानं पोलिसांना फूल समजण्याची चूक केली. त्याला काय माहीत की पोलीस फायर आहेत? बहुतांश यूझर्सनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

Stunt Video Viral : …आणि स्टंट करण्याच्या नादात थेट जमिनीवरच कोसळतो..! भावांनो, तुम्ही असं काही करू नका, नाहीतर…

…आणि अशाप्रकारे आईनं पाहिले मुलीचे प्रताप! ‘हे’ इनक्रिप्डेट नाही!! Funny Video Viral

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.