Video | मी फक्त 10 वर्षांची आहे, माहीत नाही काय करु? पॅलेस्टाईनवाल्या मुलीच्या व्हिडीओनं जग हळहळलं, युद्धाची दाहकता पुन्हा उघड

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाची संहती सांगणारा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. (israel palestine conflict viral video)

Video | मी फक्त 10 वर्षांची आहे, माहीत नाही काय करु? पॅलेस्टाईनवाल्या मुलीच्या व्हिडीओनं जग हळहळलं, युद्धाची दाहकता पुन्हा उघड
Israel palenstine conflict viral girl video
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 11:31 PM

जेरुसलेम : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel palenstine conflict) यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु असून युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.  इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनकडून एकमेकांवर रोज प्राणघातक हल्ला केला जातोय. मिसाईल्स, बॉम्बगोळ्यांचा वर्षाव या भागात होताना दिसतोय. येथे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच लहान मुलंसुद्धा उघड्यावर आली आहेत. या युद्धादरम्यान काळजाचा थरकाप उडवणाऱ्या काही घटना समोर येतायत. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाची संहती सांगणारा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. एका दहा वर्षांच्या मुलीची कथा पाहून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत. (Israel Palestine conflict shown by 10 year old girl cried while tailing war story)

मुलीला रडू कोसळलं

सोशल मीडियावर सध्या एका दहा वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीचे नाव Nadine Abdel-Taif असून ती रडताना दिसतेय. ही मुलगी राहते त्या परिसरातील सर्व घरं उद्ध्वस्त झाली आहेत. तिच्या आणि बाकीच्या लोकांची परिस्थिती सांगताना या मुलीला रडू कोसळलंय.

मी फक्त दहा वर्षींची

व्हिडीओमध्ये मुलगी युद्धामुळे तिच्या कुटुंबावर कशी अवकळा आली आहे, हे सांगत आहे. “या सर्व गोष्टींमुळे मला वैताग आला आहे. नेमकं काय करावं हे मला समजत नाहीये. मी काहीही करु शकत नाहीये. तुम्हाला हे ढिगारे दिसत आहेत. या पडक्या घराला मी ठीक करायला हवं का ? मी फक्त दहा वर्षांची आहे. मला यापेक्षा जास्त लढता येत नाहीये,” असे व्हिडीओतील मुलगी सांगत आहे.

मला डॉक्टर व्हायचं होतं

पुढे ही मुलगी आपल्या स्वप्नांबद्दल सांगत आहे. “मला माझ्या लोकांची मदत करायची होती. त्यामुळे मी डॉक्टर होण्याचं ठरवलं होतं. मला अजून काय करावं हेसुद्धा माहिती नाही. या सगळ्या गोष्टींमुळे मला भीती वाटत आहे. मला माझ्या लोकांसाठी खूप काही करायचं आहे, पण मी कसं करु हे मला समजत नाहीये. मी फक्त दहा वर्षांची आहे,” असे ही मुलगी म्हणत आहे.

ते तिरस्कार करतात, कारण आम्ही मुस्लीम

याच व्हिडीओमध्ये बोलताना ही दहा वर्षांची मुलगी रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत. पुढे बोलताना मुलगी जे सांगत आहे, ते तर अगदीच हादरवून टाकणारं आहे. “सध्याची जी परिस्थिती आहे, तिला मी रोज पाहतेय. हे सगळे पाहून आमच्यासोबत हे असं खरंच व्हायला पाहिजे होतं का ? असं मी माझ्या स्वत:लाच विचारते. आम्ही मुस्लीम असल्यामुळे ते आमचा द्वेष करतात, असं माझे पालक सांगतात. तुम्हाला माझ्या आसपास लहान मुलं दिसत असतील, हे सगळे लहान आहेत. तुम्ही यांच्यावर मिसाईल का डागत आहात ? हे सगळं जे चालू आहे, ते ठीक नाहीये,” असे मुलगी रडत रडत सांगत आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाची खरी परिस्थिती हा व्हिडीओ सांगत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. इंग्लंडचा युवा क्रिकेटर सॅम बिलिंग्स यानेसुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटी 10 लाख लोकांनी पाहिले असून अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

Video | एवढ्या ‘एका कारणामुळे’ इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय

Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

(Israel Palestine conflict shown by 10 year old girl cried while tailing war story)

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.