#LataMangeshkar : ऐ मेरे वतन के लोगों… ITBP कॉन्स्टेबलनं लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली, पाहा Video

LataMangeshkarNidhan : 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं (Song) जेव्हा वाजतं तेव्हा एक मधूर आवाज कानावर पडतो आणि तो आवाज म्हणजे मेलडी क्वीन (Melody Queen) आणि नाईटिंगेल लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज. ITBP जवानानं या गाण्यातून त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.

#LataMangeshkar : ऐ मेरे वतन के लोगों… ITBP कॉन्स्टेबलनं लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली, पाहा Video
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना ITBP पोलीस कॉन्स्टेबल
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:38 PM

LataMangeshkarNidhan : ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं (Song) जेव्हा वाजतं तेव्हा एक मधूर राग आणि आवाज कानावर पडतो आणि तो आवाज म्हणजे मेलडी क्वीन (Melody Queen) आणि नाईटिंगेल लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज. त्यांचं हे गाणं देशभरात इतके प्रसिद्ध आहे, की हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीय त्यात हरवून जातो. हे गाणं ऐकून डोळे पाणावले नसतील, अशी व्यक्ती देशात क्वचितच असेल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांचेही डोळे ओले झाले. या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ITBP जवानानं भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही ITBP जवान ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्यावर सॅक्सोफोन वाजवताना आणि लता मंगेशकर यांना एका अनोख्या शैलीत आदरांजली वाहताना पाहू शकता.

वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुजम्मल हक असं या जवानाचं नाव असून तो आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. हा अप्रतिम श्रद्धांजली व्हिडिओ ITBPच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिलं आहे, ‘ए मेरे वतन के लोगों… कॉन्स्टेबल मुझम्मल हक, ITBPनं भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली’. अवघ्या 2 मिनिटे 19 सेकंदाच्या या व्हिडीओनं लोकांची मनं जिंकली आहेत.

तेव्हा त्या रडल्या होत्या

कवी प्रदीप यांनी ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं लिहिलं आहे. हे तुम्हाला कदाचित माहित असेल. या गाण्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. असं म्हणतात, की जेव्हा लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं हे गाणं ऐकलं तेव्हा त्या रडू लागल्या आणि त्यांनी या गाण्याला आवाज दिला तेव्हा ते ऐकून संपूर्ण देश रडला आणि आजही जेव्हा हे गाणं वाजतं तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी येतं.

#LataMangeshkar : लता मंगेशकरांच्या आठवणी आणि शोकसागरात बुडाला Social Media, ‘या’ गाण्यांतून वाहिली जातेय श्रद्धांजली

#LataMangeshkar : Nightingale Forever म्हणत देशभरातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, Social Media यूझर्स शोकाकूल

शतकांचा आवाज आपल्याला सोडून निघून गेला, लतादिदींच्या जाण्याने बॉलिवूडचा महानायक हळहळला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.