Tina dabi | Tina dabi | IAS ऑफिसर टीना डाबी लवकरच देणार Good News
Tina dabi | IAS ऑफिसर टीना डाबी यांचा मोठा फॅन क्लब आहे. टीना डाबी सध्या जैसलमेरच्या जिल्हा कलेक्टर आहेत. त्यांच्या आयुष्यात लवकरच एक चांगली गोष्ट घडणार आहे.
जयपूर : जैसलमेरच्या बहुचर्चित जिल्हा कलेक्टर टीना डाबी यांच्याकडे गोड बातमी आहे. त्यांचा मोठा फॅन क्लब आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. टीना डाबी सध्या जैसलमेरच्या जिल्हा कलेक्टर आहेत. जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंगसाठी त्यांनी सरकारकडे अर्ज केला आहे. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी IAS अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर टीना डाबी चर्चेत आल्या होत्या.
सध्याच्या परिस्थितीत कामाच जास्त प्रेशर असू नये, यासाठी टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे नॉन फिल्ड पोस्टिंग मागितली आहे. पुढच्या 2-3 दिवसात ट्रान्सफर लिस्ट येईल, त्यात त्यांचं नाव असू शकते. ट्रान्सफर लिस्ट येत नाही, तो पर्यंत त्या जैसलमेरच्या जिल्हा कलेक्टर म्हणून काम पाहतील.
काय आहे गोड बातमी?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, टीना डाबी यांच्याकडे काय गोड बातमी आहे?. तर, टीना डाबी लवकरच आई होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्या आपल्या पहिल्या बाळाला जन्म देतील. लवकरच त्या मॅटरनिटीच्या रजेवर जाणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील विस्थापित पाकिस्तानी नागरिकांना त्या भेटण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्या गर्भवती असल्याच समजलं.
राज्य सरकारला लिहिलं पत्र
पाकिस्तानातून आलेल्या वृद्ध महिलेने त्यांना मुलगा होईल, म्हणून आशिर्वाद दिला. त्यावेळी त्या खळखळून हसल्या होत्या. मुलगी आणि मुलगा यामध्ये मी फरक करत नाही, असं टीना डाबी म्हणाल्या होत्या. प्रेग्नसीमुळेच त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून राजधानी जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंग मागितलीय. टीना डाबी यांनी जैसलमेरहून जयपूरला जाण्याची तयारी पूर्ण केलीय. टीना डाबी यांनी आपलं घरगुती सामान पॅक करुन पुढे पाठवून दिलय. येत्या 1-2 दिवसात ट्रान्सफर ऑर्डर येईल. सध्या त्या आपल्या घरातील कार्यालयातून कामकाज करत आहेत.