Video: जेएनयूचा सिक्युरिटी गार्ड ‘ज्युली’ गाण्यावर थिरकला, लोक म्हणाले, भारतात टॅलेंटची कमी नाही!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरक्षा रक्षक 'जुली' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांना पाहून तिथं हजर असलेले विद्यार्थीही जल्लोष करत आहेत.

Video: जेएनयूचा सिक्युरिटी गार्ड 'ज्युली' गाण्यावर थिरकला, लोक म्हणाले, भारतात टॅलेंटची कमी नाही!
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:21 PM

जर कुणाकडे टॅलेंट असेल तर तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, त्याचं टॅलेंट वाया जात नाही. सोशल मीडिया तर टँलेंटला व्यासपीठ देणारं सर्वात मोठं माध्यम तयार झालं आहे. अनेकजण असे आहेत, ज्यांना सोशल मीडियाने एका रात्रीत स्टार बनवलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या गायन आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर नवी ओळख मिळाली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर असाच काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खरी प्रतिभा स्पष्टपणे दिसत आहे. नुकताच सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही क्षणांत वाह-वाह म्हणाल…! (JNU Security Guard dance on julie julie song Viral dance performance)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरक्षा रक्षक ‘जुली’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांना पाहून तिथं हजर असलेले विद्यार्थीही जल्लोष करत आहेत. यानंतर सुरक्षा रक्षक न थांबता आपला डान्स सुरू ठेवतो. त्या व्यक्तीचे डान्स स्टेप्स पाहून तिथले विद्यार्थीच नव्हे तर सोशल मीडियावरचे लोकही भारावून गेले आहेत.

व्हिडीओ पाहा

‘जेएनयू डान्स क्लब’नेच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘कलाकाराची कला कधीच मरत नाही!!! बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, Amazing आणि दुसऱ्याने कमेंट केली, विश्वास बसत नाही. त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले की, या व्यक्तीने डान्स फ्लोअरला आग लावली आहे. तुमच्या माहितीसाठी, 1987 मध्ये एक बॉलिवूड अॅक्शन फिल्म ‘जीते हैं शान से’ रिलीज झाली होती, त्यात मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त आणि गोविंदा यांनी अभिनय केला होता. त्याच चित्रपटातील हे गाणं आहे.

हेही पाहा:

Video: चोर पोलिसाचा खेळ, चोराने चक्क अरुंद खिडकीतून पळून दाखवलं, पाहा चोरट्याचं भन्नाट स्किल!

Video: सारा अली खानच्या गाण्यावर एअर होस्टेसचा विमानातच ‘चका चक’ डान्स, व्हिडीओला हजारो लाईक्स

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.