Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video
Haunted restaurant : खाद्यपदार्थ (Food) आणि त्याच्याशी संबंधित कंटेंट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होणारा भाग आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक अजब रेस्टॉरंटचा हा व्हिडिओ आहे.
Haunted restaurant : खाद्यपदार्थ (Food) आणि त्याच्याशी संबंधित कंटेंट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होणारा भाग आहे. लोकांनाही असे व्हिडिओ आवडत असल्यानं अपलोड करणारे किंवा तयार करणारे लोकही मग असे व्हिडिओ तयार करायलाच पहिली पसंती देतात. खाद्यपदार्थ बनवणं किंवा रेस्टॉरंट आदींचे व्हिडिओ लोकांना पाहायला जास्त आवडतात. खवय्यांना त्यातून नवनवीन कल्पना सुचत असतात. वेगवेगळे खाद्यपदार्थ एकतर घरी ट्राय करणं किंवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं एखादं प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जाऊन विविध डिश, पदार्थ चाखणं हा काही लोकांचा आवडीचा भाग आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक अजब रेस्टॉरंटचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत जे काही या रेस्टॉरंटमध्ये बनवलं जातं, त्यासंबंधी माहिती दिलीय. हा एक वेगळाच व्हिडिओ असल्यानं तो व्हायरल होतोय.
कबर असलेल्या ठिकाणी खावं लागतं?
व्हिडिओमध्ये पाहू शकतो, की एक रेस्टॉरंट दाखवलंय. कबर असलेल्या ठिकाणी तुम्हाला इथं खावं लागतं, असं व्हिडिओत सांगण्यात आलंय. त्याबरोबरच दुधात पाणी मिसळलं जातं एवढंच नाही, तर जॅममध्येही पाणी टाकलं जातं, चहामध्ये बोर्नव्हिटा टाकलं जातं. या विचित्र गोष्टी थांबत नाहीत, तोच माहिती सांगणारा अजून एक धक्कादायक माहिती देतो, ती म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही, असंही तो सांगतो. विशेष म्हणजे चित्रकार एम. एफ. हुसैन भारतात आले की या रेस्टॉरंटला भेट द्यायचे, अशी माहिती यातून देण्यात आलीय.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर हा व्हिडिओ फुडी इनकार्नेट (Foodie Incarnate) 20 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला यूझर्स पसंत करत आहेत. आतापर्यंत 1.2 मिलियन व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत. त्यात वाढत होत आहे. कब्रों के बीच बैठ कर खाया जाता है यहाँ, KABRISTAN Wala Restaurant असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यावरच्या कमेंट्सही भन्नाट आहेत. (Video courtesy – Foodie Incarnate)