Donation : नाव ‘फकीरचंद’, व्यवसाय भंगार वेचणं, काम श्रीमंतांना लाजवेल असा ‘दानधर्म’
Donation : दानवीराचा हा नवीन अवतार आहे. भंगाराच्या व्यवसासायातून जमवलेल्या कमाईतून त्यांनी डोळे विस्फारतील असा दान धर्म केलाय. त्यांनी आतापर्यंत इतक्या गरीब मुलींची लग्न लावून दिली आहेत.
नवी दिल्ली : जगभरात अनेक दानवीर आहेत. महाभारतातील दानवीर कर्ण पासून जमशेदजी टाटा पर्यंत अनेक दानवीरांची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. अनेक धर्मग्रंथात दान धर्म करण्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे अनेक लोक दानधर्म करतात. कोणी वस्तुच्या स्वरुपात दान करतात, तर कोणी पैशांच्या स्वरुपात. कोणी सांगून, गाजावाजा करत दानधर्म करतात तर अनेक जण न सांगता दान करत राहतात. अशीच ही गोष्ट आहे एका दानवीराची त्याचे नाव जरी ‘फकीरचंद’ असले तरी ते दान करण्याच्याबाबतीत खूप श्रीमंत आहे. फकीरचंद त्याच्या कमाईतील 90 टक्के दान करतात.
फकीरचंद भंगार गोळा करण्याचे काम करतात. दिवसाला 600 ते 700 रुपये कमावून ते बँकेत जमा करतात. आतापर्यंत जमा झालेल्या पैशातून 35 लाख रुपये दान केले आहेत. फकीरचंद यांचे लग्न झालेले नाही, त्यांच्या 5 भावडांचा मृत्यू झाला असून ते एकटेच राहतात. हरियाणातील कैथल येथील रहिवाशी फकीरचंद यांची ही गोष्ट आहे.
दररोजची कमाई किती?
कैथल येथे त्यांचे 2 गु्ंठ्यात एकच खोली असलेले घर आहे. त्यांचे वय 53 वर्ष असून ते भंगार गोळा करण्याचे काम करतात. दररोज 600-700 रुपये कमावून ते दान करतात. आतापर्यंत 35 लाख रुपये दान केले असून, 5 गरीब मुलींचे लग्न त्यांनी करुन दिले आहे. या लग्नात मुलींना 75 हजार रुपयांच्या वेगवेगळ्या वस्तूही भेट दिल्या आहेत. आज तकने हे वृत्त दिलय.
वडिलोपार्जीत काय आहे?
फकीरचंद अजूनही बटनाचा मोबाईल वापरतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जीत 2 गुंठे जमीन असून त्याच्यावर फक्त 1 खोलीचे घर आहे. ज्यात कोणत्याही सुविधा नाहीत. मृत्यूनंतर हे घरही दान करणार असल्याचे फकीरचंद यांनी सांगितले आहे.
फकीरचंद काय म्हणतात?
फकीरचंद सांगतात, “मी आरामात जीवन जगू शकलो असतो. माझ्या भांवडाच्या निधनानंतर सर्व संपत्ती माझ्या नावावर झाली. मला सर्व सुविधांचा लाभ घेता आला असता. पण, माझा मेहनतीवर विश्वास आहे. मेहनत करुन पोट भरण्यात मला आनंद आहे. जोपर्यंत मी मेहनत करत राहील तोपर्यंत माझे शरीर स्वस्थ राहील, मला माझ्या मेहनीतेचे फळ पुढच्या जन्मात नक्कीच मिळेल”
किती मुलींची लग्न लावून दिली?
फकीरचंद पुठ्ठे गोळा करुन भंगारात विकण्याचे काम करतात. ते 25 वर्षांपासून पायी फिरत पुठ्ठे गोळा करण्याचे काम करतायत. रोज 600-700 रुपये कमाई करुन ते पैसे बँकेत जमा करतात. पैसे गोळा झाल्यावर वेगवेगळ्या सामाजिक संस्थेना दान करतात. फकीरचंद यांनी आतापर्यंत 5 गरीब मुलींची लग्न लावून दिली आहेत. त्यांनी प्रत्येक मुलीला 75 हजार रुपयांचे गृहउपयोगी वस्तू दिल्या आहेत. फकीरचंद यांनी आतापर्यंत केलेल दानधर्म
कैथल येथील गोपाळ धर्मशाळेत गायींसाठी शेड बनवले ज्यासाठी 3 लाख रुपये खर्च केले.
नंदीशाळा येथे शेड बांधन्यासाठी 4 लाख रुपये दान केले.
वृद्ध आश्रमसाठी 2 लाख 30 हजार रुपये दान दिले.
विविध मंदिरात गायींसाठी शेड बनवण्यासाठी दान दिले आहे.