AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : 8 व्या मजल्यावर लटकलेल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी, हवेतील रेस्क्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ…

या चिमुकलीची आई खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्यावेळी ही 3 वर्षीय मुलगी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती तिचा तोल गेला पण जवळच असलेल्या खांबाला ती पकडून राहिली. मग तिला वाचवण्यात आलं.

Video : 8 व्या मजल्यावर लटकलेल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी, हवेतील रेस्क्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ...
| Updated on: May 16, 2022 | 5:00 PM
Share

मुंबई : अनेकदा काही अपघात झाल्यास त्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवल्याचं आपण पाहिलं आहे. अश्याच एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हीडिओ सध्या समोर आला आहे. कझाकिस्तानमध्ये 8 व्या मजल्यावर लटकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. या चिमुकलीला (Little Girl Video) वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावली. अन् या चिमुकलीचा जीव वाचवला. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने 8 व्या मजल्यावरून पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचं दिसतंय. ही सगळी घटना रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलीय आणि त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

या चिमुकलीची आई खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्यावेळी ही 3 वर्षीय मुलगी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती तिचा तोल गेला पण जवळच असलेल्या खांबाला ती पकडून राहिली. मग तिला वाचवण्यात आलं.

द गुड न्यूज मूव्हमेंटने हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा माणूस आपल्या मित्रासोबत फिरत होता तेव्हा त्याने या मुलीला पाहिलं. कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्याने तिचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. ‘सबित शोंटकबाएव काल एका मित्रासोबत कामावर जात असताना त्याने एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर एका खिडकीला झुलत असलेली लहान मुलगी पाहिली. सबित ताबडतोब इमारतीवर पोहोचला आणि त्याने या चिमुकलीचा जीव वाचवला.

या सगळ्या घटनेविषयी सबितने स्पष्टीकरण दिलं. त्याने सांगितलं की, “माझ्याकडे सुरक्षा रक्षक नव्हते. म्हणून माझ्या मित्राने माझे पाय धरले. त्यावेळी मी काहीही विचार केला नाही, मला फक्त मुलाला मदत करायची होती. मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यामुळे मी या चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलो.”

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.