VIDEO | भारतातील ‘हा’ धबधबा जगभरात प्रसिद्ध, डोळ्यांचं पारणे फेडणारं दृष्य, येथे एकदा नक्की जा…
हा धबधबा असा दिसतो जणूकाही आकाशातून थेट जमिनीवर पडतो आहे (Khandadhar Beautiful Waterfall).
मुंबई : भारत हा विविधतेचा देश आहे. वेग-वेगळे हवामान आणि तापमानामुळे येथील प्रकृतीचे (Khandadhar Beautiful Waterfall) ही वेगवेगळे रुप पाहायला मिळणार आहेत. कुठे डोंगर तर कुठे मैदान आहेत. कुठे नदी तर कुठे कोरडं वाळवंट. हेच कारण आहे की आपल्या देशातील नैसर्गिक सुंदरता जगभरातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. भारतात अनेक सुंदर ठिकाणं आहेत. या ठिकाणी एकदा गेल्यावर तिथून परत येण्याची इच्छा होत नाही, ते इतकं सुंदर आणि मनाला शांतता देणारं आहे (Khandadhar Beautiful Waterfall In Sundergarh Odisha).
सोशल मीडियावर अशा अनेक फोटो फिरत असतात ज्यामुळे देश-विदेशातील सुंदरता लोकांना घरबसल्या पाहायला मिळते. अशाच एका सुंदर ठिकाणंचा व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउण्टवर शेअर केला आहे. यामध्ये एक धबधबा दिसत आहे. हा धबधबा असा दिसतो जणूकाही आकाशातून थेट जमिनीवर पडतो आहे. या व्हिडीओ शेअर करत त्या लोकांना हे ठिकाण कोणतं हे ओळखण्यास सांगितलं. पण, नंतर त्यांनी स्वत: आखणी एक ट्वीट करत त्या ठिकाणाची माहिती दिली. हा धबधबा सुंदरगड येथील आहे आणि याचं नाव खंडधार वॉटरफॉल आहे.
पाहा व्हिडीओ –
How many of you can recognise this beautiful place & that free flowing waterfall? India’s best kept secret. pic.twitter.com/JteHRYDdCN
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 12, 2021
खंडधार वॉटरफॉल (Khandadhar Waterfall, Sundergarh)-
हा ओदिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात घनदाट जंगलात आहे. याची एकूण उंची 801 फूट आहे. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचा हा धबधबा जगभरातील नेचर लव्हर्सला आपल्याकडे आकर्षित करत आहेत.
Khandadhar Beautiful Waterfall In Sundergarh Odisha
संबंधित बातम्या :
Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली
VIDEO | जीवाची बाजी लावत त्याने महाकाय व्हेलला वाचवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल