टाझांनियातील बहीण भावांनी या भारतीय गाण्यावर घातला आहे धुमाकूळ, व्हिडिओ झाला व्हायरल

भारतीय चित्रपटांच्या गाण्यांचे चाहते फक्त आपल्याच देशात आहेत असं नाही तर जगभरात ती गाणी ऐकली जातात. त्यामुळेच बॉलिवूडच्या गाण्यावर आजही परदेशातील चाहते थिरकताना दिसतात.

टाझांनियातील बहीण भावांनी या भारतीय गाण्यावर घातला आहे धुमाकूळ, व्हिडिओ झाला व्हायरल
kili and nima
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 2:56 PM

मुंबईः सोशल मीडियावर (Social Media) बहीण भावांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हे बहीण भाऊ आहेत टांझानियातील. भारतीय (Indian singer) गायिका नेहा कक्कड आणि जुबिन नौटीयाल यांच्या ‘तारों के शहर’ या गाण्यावर ही बहीण-भाऊ लिप सिंक करताना दिसत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 11 लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ बघितला आहे, आणि सगळ्यांनी त्यांना चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. याआधीही या दोघा भावंडांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आणि त्यालाही चांगले व्ह्यूज मिळाले होते.

भारतीय चित्रपटांच्या गाण्यांचे चाहते फक्त आपल्याच देशात आहेत असं नाही तर जगभरात ती गाणी ऐकली जातात. त्यामुळेच बॉलिवूडच्या गाण्यावर आजही परदेशातील चाहते थिरकताना दिसतात. त्यातीलच एक आहेत, टांझानियामधील भाऊ-बहीण. किली पॉल आणि आणि नीमा पॉल यांना ठेका धरला आहे. ही दोघंही बॉलीवूडमधील गाजलेल्या गाण्यांवर लिपसिंक करुन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सोशल मीडियावर असलेले यूजर्सही या भावा बहिणींच्या व्हिडिओला पसंद करत आहेत.

भारतीय यूजर्सकडून कौतूक

आता या बहिण भावांचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हे दोघे बहीण भाऊ नेहा कक्कड आणि जुबिन नौटियाल यांचे तारों के शहर या गाण्यावर ही दोघे लिपसिंक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अकरा लाखापेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे.

स्टाईल जबरदस्त

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत समोर नीमा उभी राहिली तर किली पॉल तिच्या मागे उभा आहे. ही दोघंही 2020 मध्ये नेहा आणि जुबिनच्या आलेल्या तारों के शहर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं भारतात प्रचंड गाजले होते, ते आता आफ्रिकेमध्ये गाजत आहे, आणि तेथील लोकंही मोठ्या प्रमाणात ऐकत आहेत. किली पॉलची लिपसिंक एवढी खास नसली तरी तिची स्टाईल जबरदस्त आहे. त्यामुळेच या दोघा बहीण भावांचा व्हिडिओ अनेक जण पाहत आहेत.

सोशल मीडियामुळे अनेक सेलिब्रेटी

सध्या जगात प्रसिद्ध व्हायचे असेल तर सोशल मीडिया हा एक उत्तम पर्याय आहे. सोशल मीडियावर असे काही लोकं आहेत जे काही ना काही कलाकारगिरी करतात आणि इंटरनेटवर रातोरात सेलिब्रेटी होतात. यामध्ये आता आफ्रिकेतील बहीण भाऊ किली पॉल आणि नीमा पॉल यांचाही यात समावेश होतो आहे. ही दोघं भावंडं कायम बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स आणि लिपसिंक करून भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या दोघांनी कोणतंही गाणं जरी अपलोड केले तरी त्याला लाखो लोक त्यांना पाहत आहेत.

त्या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत. एका यूजर्सने म्हटले आहे की, दीदी तुम्ही ठेका खूप सुंदर धरला आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, आपण दोघं बहीण भाऊ कमाल आहात, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असतो. किली पॉलने या व्हिडिओला आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

‘माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?’ दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर आणि बहिण अनिशा पादुकोण म्हणाली…

Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गेहराईयाँ’चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार

Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.