Kili Paul Video : किली पॉलचं ‘मैं जिस दिन भुला दू’ गाण्यावर लिपसिंक, जुबिन नौटियालनंही दिली दाद

हिंदी गाण्यांवर लिपिसिंक (Lipsync) आणि डान्सचे काही व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत आहेत. किली पॉल(Kili Paul)चा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यात तो गायक जुबिन नौटियालच्या 'मैं जिस दिन भुला दू' या गाण्यावर लिपसिंक करताना दिसतोय.

Kili Paul Video : किली पॉलचं ‘मैं जिस दिन भुला दू’ गाण्यावर लिपसिंक, जुबिन नौटियालनंही दिली दाद
किली पॉल, जुबिन नौटियाल
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 1:23 PM

बॉलिवूड (Bollywood) चित्रपट आणि गाण्यांची क्रेझ जगभर पसरलेली आहे. यामुळेच परदेशी लोकही आपल्या देशी गाण्यांवर जोरदार नाचताना दिसतात. अशाच संगीतानं हृदय जोडणारी टांझानियन भाऊ-बहीण जोडी गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याच हृदयात स्थान करून बसली आहे. हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर लिपिसिंक (Lipsync) आणि डान्स करतानाचे काही व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर चांगलेच व्हायरल (Viral) होत आहेत. यूझर्सही त्यांना पसंती देत आहेत. आता याच प्रकारामध्ये किली पॉल(Kili Paul)चा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यात तो गायक जुबिन नौटियालच्या ‘मैं जिस दिन भुला दू’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसतोय.

एक्सप्रेशन्सही अप्रतिम

टांझानियाचा टिकटॉक स्टार्स किली पॉल आणि नीमाबद्दल. अलीकडेच, आफ्रिकेतल्या या भावंडांनी त्यांचा आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे आणि या व्हिडिओमध्ये, आदिवासी पोशाख परिधान करून, तो गायक जुबिन नौटियालच्या ‘मैं जिस दिन भुला दू’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसतोय. व्हिडिओमधले त्याचे एक्सप्रेशन्सही खरोखरच अप्रतिम दिसतात. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओवर खुद्द जुबिन नौटियालनंही आपली प्रतिक्रिया दिलीय. हार्ट इमोजीनं त्यानं रिअॅक्ट केलंय.

किली पॉलनं व्हिडिओ केला शेअर

हा व्हिडिओ किली पॉलनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. अलीकडेच त्यानं सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या ‘शेरशाह’ चित्रपटातलं ‘रातन लांबियां’ गाणं लिपसिंक केलं ते ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं. आता त्याचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला लोक पसंत करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

इन्स्टाग्रामवर व्हिडिओंचा महापूर

जुबिन नौटियालच्या ‘मैं जिस दिन भुला दू’ या गाण्याचं वेड सर्वांना आहे. #MainJisDinBhulaaDu सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागला आहे. लोक या गाण्यावर अशा पद्धतीनं नाचत आहेत, की इन्स्टाग्रामवर या ट्रॅकच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे.

Video : ढील दे दे रे बंदर भैया… पतंगबाजीत माकडही नव्हतं मागे, संक्रांतीदिवशी छतावर चढत दिला शानदार परफॉर्मन्स

Antelopes Fighting : जामदरा घोटी शेतशिवारात रंगली दोन काळविटांची झुंज, पाहा Video

Dog & Snake Fight : एका सापावर तीन कुत्र्यांची दादागिरी! कशामुळे चवताळले कुत्रे? पाहा Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.