AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जम्मू काश्मीरमध्ये सर्वांसमोर बिबट्याचा एकावर हल्ला, कुणाचीही हिंमत झाली नाही, अखेर एकाच्या हिमतीने जीव वाचला

जम्मू काश्मीरमधील गांधीनगर भागात ग्रीन बेल्ट पार्कमध्ये एका बिबट्याने सर्वांसमोर एका व्यक्तीवर हल्ला चढवला.

VIDEO: जम्मू काश्मीरमध्ये सर्वांसमोर बिबट्याचा एकावर हल्ला, कुणाचीही हिंमत झाली नाही, अखेर एकाच्या हिमतीने जीव वाचला
| Updated on: Apr 06, 2021 | 4:32 PM
Share

Leopard attack in Jammu Kashmir श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील गांधीनगर भागात ग्रीन बेल्ट पार्कमध्ये एका बिबट्याने सर्वांसमोर एका व्यक्तीवर हल्ला चढवला. बिबट्या इतका हिंस्र झाला होता की अनेकांसमोर हा हल्ला झालेला असतानाही कुणाचीही पुढे सरसावण्याची हिंमत झाली नाही. मात्र, अखेर तेथे उपस्थित एका व्यक्तीने एका काठीच्या सहाय्याने बिबट्याला झोडपले. त्यामुळे या व्यक्तीचा जीव जाता जाता वाचला. सर्वांसमोर हा जीवघेणा हल्ला झाल्याने या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केलीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय (Leopard attack on man in Green belt park Gandhinagar Jammu Kashmir).

काठीने हल्ला करुनही बिबट्याचा पुन्हा हल्ला

बिबट्याच्या या हल्ल्यात स्पष्टपणे दिसत आहे की बिबट्या एका व्यक्तीवर अचानक हल्ला चढवतो. यावेळी पार्कच्या भिंतीपलीकडे अनेक लोक उभे राहून ही घटना पाहतात. मात्र, बिबट्याच्या आक्रमकपणा समोर कुणाचीही पुढे येऊन या व्यक्तीला वाचवण्याची हिंमत होत नाही. मात्र, त्याचवेळी एकजण बाजूच्या काठीने बिबट्यावरच हल्ला चढवतो. काठीचे फटके पडल्याने बिबट्या काही क्षण बाजूला पळतो, मात्र लगेचच मागे फिरून पुन्हा हल्ला करतो.

काही क्षण बिबट्या मागे पळाला आणि जीव वाचला

बिबट्याने पुन्हा हल्ला केल्यानंतर सोबत असलेला व्यक्ती पुन्हा बिबट्याला काठीने झोडपतो. तेव्हा बिबट्या काही क्षण मागे पळतो. मात्र, पुन्हा चाल करुन येतो. मात्र, मध्ये काही क्षण वेळ मिळाल्याने तोपर्यंत हे दोघेही जीवाच्या आकांताने धावत शेजारच्या गाडीचा आसरा घेत गाडीत बसतात आणि आपला जीव वाचववात.

पार्क परिसरात दहशतीचं वातावरण

गांधीनगरमधील या पार्कमध्ये बिबट्याने हल्ला केल्याने आजूबाजूच्या परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. अनेक लोक भितीच्या सावटाखाली राहत आहेत. त्यामुळेच ग्रीन बेल्ट पार्कच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या या बिबट्याचा शोध सुरु आहे. लवकरच या बिबट्याला जेरबंद करुन सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पार्क प्रशासनाने दिलीय.

हेही वाचा :

मनमाडमध्ये बिबट्याचं दर्शन, सशाच्या शिकारीचा व्हिडीओ कैद

बीडमध्ये बिबट्याची दहशत, आठ दिवसात तिघांचा मृत्यू, 6 जण जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय नागनाथ गर्जेंचा मृत्यू, मुंडेंनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

व्हिडीओ पाहा :

Leopard attack on man in Green belt park Gandhinagar Jammu Kashmir

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.