AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुलाचा जीव घेण्यासाठी आलेल्याला आईनं घडवली अद्दल!

मुलाच्या अंगावर आलेल्यांना शिंगावर कसं घ्यायचं, हे कोणत्याच आईला शिकवावं लागत नाही. ते प्रकृतीनं (Nature) प्रत्येक आईला शिकवूनच या निसर्गात आणलेलं असतं, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे.

Video | मुलाचा जीव घेण्यासाठी आलेल्याला आईनं घडवली अद्दल!
Source - Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 11:30 AM

आईसाठी तिचं बाळ म्हणजे जीव की प्राण! मुलाला काहीही झालं, तरी सगळ्यात आधी आईचा जीव तुटतो. त्याला कोणी हानी पोहोचवली तर अद्दल घडवण्यासाठीसुद्धा आई सगळ्यात पुढे असते. हा निसर्गाचा नियमच आहे! त्यातही जर कुणी आपल्याच मुलाच्या जिवावर उठलं, तर मुलाची आई शांत थोडीच बसणार? ती पेटून उठणारच! मुलाच्या अंगावर आलेल्यांना शिंगावर कसं घ्यायचं, हे कोणत्याच आईला शिकवावं लागत नाही. ते प्रकृतीनं (Nature) प्रत्येक आईला शिकवूनच या निसर्गात आणलेलं असतं, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे.

काय आहे नेमकी घटना?

अवघ्या २८ सेकंदाची ही घटना आहे. पण अंगावर काटा आणेल, असा थराराक प्रकार यावेळी घडला. हा सगळा थरार कॅमेऱ्यातही कैद झालाय. रानडुकराच्या पिल्लावर बिबट्यानं जोरदार हल्ला चढवला. रानडुकराचं पिल्लू बिबट्याच्या हल्ल्यानं बिथरलं. जिवाच्या आकांतानं पळू लागलं. पण सुपरफास्ट बिबट्यासमोर रानडुकराच्या पिल्लाचा वेग हा तोकडा पडणार, हे तर स्पष्ट होतं. झालंही तसंच!

आपल्याला चांगली शिकार मिळाली, याच्या आनंदात असलेल्या बिबट्यानं रानडुकराच्या पिल्लाला सहज धावत-धावतच तोंडात शिकारीसाठी उचललही होतं. पण आपल्याला शिकार मिळाली, याचा आनंद फार वेळ काही बिबट्याला साजरा करता आला नाही.

आणि पळ काढावाच लागला!

काही कळायच्या आतच. अचानक बिबट्यानं रानडुकराच्या पिल्लाला तोंडातून सोडलं आणि बिबट्या जिवाच्या आकांतानं पळू लागला! कारण आपल्या मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्लातून त्याला वाचवण्यासाठी पिल्लू रानडुकराची आई बिबट्याच्या दिशेनं झेपावली होती. अत्यंत आक्रमकपणे रानडुकराची आई आपल्या दिशेनं पळत येतेय, हे पाहून बिबट्याही बिथरला. रानडुकराच्या पिल्लाची शिकार क्षणात त्यानं सोडून दिली आणि जीव वाचवण्यासाठी तो धडपडू लागला. अखेर बिबट्यानं शिकार सोडली आणि मैदानातून पळ काढला.

छोट्यावर गुरगुरणं, मोठ्याला घाबरणं!

छोटा मासा मोठ्या माशाला खाणार, हा निसर्गाचा नियम आहे. पण जगण्यासाठीचा संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. हे यावेळी बघायला मिळालं. या संघर्षात बिबट्यापेक्षा कमजोर समजल्या जाणाऱ्या रानडुकरानं जी हिंमत दाखवली, ती पाहून सगळेच अवाक झालेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

wild_animals_of_theworld नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २८ सेकंदांचा हा थरार आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. जंगलात फिरायला आलेल्या एका पर्यटकानं हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केलाय.

इथे पाहा २९ सेकंदांचा संपूर्ण थरार –

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

America | उंदरांना मारण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर! काय आहे नेमकं प्रकरण?

Tesla baby | गाडीतून चाललेली, प्रसुती कळांनी विव्हळली, आणि मग फ्रंट सीटवरच…

Video | थरारक! भाऊ पाचव्या मजल्यावर आगीत अडकला होता, बहिणीच्या धाडसामुळे थोडक्यात वाचला

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.