Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

फटाक्यां(Firecrackers)च्या आवाजाने कुत्र्यां(Dogs)ना त्रास होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. नुकताच असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये फटाक्यांच्या आवाजाने कुत्रा त्रस्त होतो. पण त्याच्या शेजारी एक निरागस मुलगी (Cute girl) उभी होती. तिने असे काहीतरी केले की सर्वांचेच मन जिंकले.

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की...
कुत्रा आणि चिमुरडी
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 10:51 AM

Kid puppy video : सोशल मीडियावर कधी, कोणाचा आणि कोणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, काही सांगता येत नाही? दररोज हजारो व्हिडिओ शेअर केले जातात, परंतु काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला खूप आवडतात. आजकाल असा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. फटाक्यां(Firecrackers)च्या आवाजाने कुत्र्यां(Dogs)ना त्रास होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. कारण ते आवाज आपल्यापेक्षा 25 टक्के जास्त ऐकतात. त्यामुळेच फटाक्यांचा आवाज ऐकून कुत्रे अस्वस्थ होतात. नुकताच असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये फटाक्यांच्या आवाजाने कुत्रा त्रस्त होतो. पण त्याच्या शेजारी एक निरागस मुलगी (Cute girl) उभी होती. तिने असे काहीतरी केले की सर्वांचेच मन जिंकले. मुलीच्या या निरागसपणाने यूझर्सची मने जिंकली असून हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

कुत्र्याच्या रक्षणासाठी…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका मुलीने तिच्या हातांनी कुत्र्याचे कान झाकले होते, जेणेकरून फटाक्यांच्या आवाजाने त्याला त्रास होऊ नये. फटाके वाजणे थांबताच तिने त्याच्या कानावरून हात काढला. तिने कुत्र्याच्या डोक्यावर थोपटून त्याचे सांत्वन केले आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहिली.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा 16 सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ ट्विटर यूझर टोंग बिंगक्स्यूने शेअर केला आहे. याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, की चीनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान हृदयस्पर्शी क्षण. फटाक्यांची भीती टाळण्यासाठी एक लहान मुलगी आपल्या पाळीव प्राण्याचे कान झाकते. तसेच हा व्हिडिओ दक्षिणपूर्व चीनच्या जिआंगशी प्रांतात शूट करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

“मुलांच्या हृदयात कोणासाठीही फसव्या भावना नसतात.”

जेव्हा लोकांनी या मुलीचे कुत्र्यावरील प्रेम पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. एका यूझरने म्हटले, “मुलांच्या हृदयात कोणासाठीही फसव्या भावना नसतात.” दुसर्‍याने लिहिले, “कुणीतरी सत्य सांगितले आहे की प्रेमाचे वर्णन करता येत नाही! याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Emotional Video Viral : छोट्या मुलीची मोठी गोष्ट! ‘या’ चिमुरडीचे बोबडे बोल डोळ्यांतून आणू शकतात पाणी.!!

Viral : कोंबडीचं असं अतरंगी पिल्लू क्वचितच पाहिलं असेल; यूझर्स म्हणतायत, हा तर जेम्स बाँड निघाला!

Kacha Badamवर Dance करणारी किती गोड आहे ही चिमुरडी! Viral झालेला ‘हा’ Video पुन्हा पुन्हा पाहाल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.