तिला सांगा कोणीतरी तो साप आहे, खेळणं नाही! Viral होत असलेला हा धक्कादायक Video पाहा

Little girl playing with snake : एक लहान मुलगी अनेक फूट लांब सापासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मखमली कापडावर काळ्या रंगाचा साप आणि एक मुलगी दिसत आहे.

तिला सांगा कोणीतरी तो साप आहे, खेळणं नाही! Viral होत असलेला हा धक्कादायक Video पाहा
भल्या मोठ्या सापासोबत खेळताना लहान मुलगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 2:08 PM

Little girl playing with snake : सोशल मीडियाच्या दुनियेत अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी अनेक फूट लांब सापासोबत खेळताना दिसत आहे. आपण पाहू शकता, की मुलगी फार मोठी नाही आणि ती पुन्हा पुन्हा धोकादायक साप पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मखमली कापडावर काळ्या रंगाचा साप आणि एक मुलगी दिसत आहे. एखाद्या खेळण्यासारखे ही मुलगी सापाशी खेळत आहे. व्हिडिओमध्ये साप खूपच भयानक दिसत आहे. पण मुलीच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नाही. ती बिनधास्त सापाला पुन्हा पुन्हा पकडते आणि नंतर त्याला आपल्याकडे ओढताना दिसते.

इन्स्टाग्रामवरून शेअर

साप किती चपळ आहे आणि कपड्यांवर किती वेगाने रेंगाळतो हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. सापही काही लहान नाही. एका मुलीचा आणि सापाचा हा अतिशय भीतिदायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर snakemasterexotics नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 7 दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ariana (@snakemasterexotics)

‘हे खरे आहे का?’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने प्रश्न विचारला आहे की, हे खरे आहे का? त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की ही मुलगी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक धाडसी आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच त्याचे संतुलन बिघडले. काही यूझर्सनी असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे, की पालकांनी मुलांना अशा प्राण्यांबरोबर एकटे सोडू नये, जरी ते विषारी नसले तरीही.

आणखी वाचा :

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

Funny Video viral : ‘जय महाराष्ट्र, हरहर महादेव, जय बजरंग बली, काका, काकू, मामा, मामी…; पाळण्यात बसल्यावर मुलाला हे काय झालं?

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.