AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral

कडाक्याच्या थंडीत अशी माणसं आपापल्या घरात चादरी आणि ब्लँकेट(Blanket)मध्ये आरामात बसतील, पण ज्यांना राहायला जागा नाही त्यांचं काय? अनेक लोकांना रस्त्यावर जगावं लागतं. अशा परिस्थितीत या कडाक्याच्या थंडीत लहान मुलांची काय अवस्था होत असेल? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी थंडीनं कुडकुडत आहे आणि एक व्यक्ती तिला थंडीपासून वाचण्यासाठी मदत (Help) करत आहे.

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral
थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरडीला व्यक्तीची मदत
| Updated on: Jan 30, 2022 | 3:32 PM
Share

Kid Video : गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Cold) आहे. दुपारच्या वेळी काही ठिकाणी ऊन पडत असलं तरी थंड हवेमुळे लोकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी सूर्यही दिसत नसल्यानं लोकांना प्रचंड थंडी वाजत आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आता एवढ्या कडाक्याच्या थंडीत अशी माणसं आपापल्या घरात चादरी आणि ब्लँकेट(Blanket)मध्ये आरामात बसतील, पण ज्यांना राहायला जागा नाही त्यांचं काय? अनेक लोकांना रस्त्यावर जगावं लागतं. अशा परिस्थितीत या कडाक्याच्या थंडीत लहान मुलांची काय अवस्था होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी थंडीनं कुडकुडत आहे आणि एक व्यक्ती तिला थंडीपासून वाचण्यासाठी मदत (Help) करत आहे.

व्क्ती देवदूतच

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी थंडीमुळे कशी थरथरत आहे. तिच्याकडे ना बूट ना टोपी. तिनं फक्त चप्पल घातली आहे. तसेच, तिनं एक पातळ स्वेटर घातला आहे, मात्र तो तिला थंडीपासून वाचवण्यासाठी पुरेसा नाही. दरम्यान, एक व्यक्ती तिच्यासाठी देवदूत बनून येते आणि तिला बसवते आणि हातमोजे आणि पायातही मोजे घालते. हे मानवतेचं खरं उदाहरण आहे. असे लोक आजच्या जगात क्वचितच पाहायला मिळतात, जे गरजू लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

ट्विटर हँडलवर शेअर

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून त्यावर ‘मानवतेचा आदर’ असं कॅप्शन लिहिलं आहे. 40 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया यूझर्सनी कमेंट करत हा व्हिडिओ त्यांच्या हृदयाला भिडल्याचं म्हटलं आहे.

Viral Video : ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’वर गातोय हा गोड मुलगा, बोबडे बोल ऐकून चिमुकल्याच्या प्रेमात पडाल!

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.