मुंबई : कोणतेही काम सोपे नसते, पण इच्छाशक्ती असेल तर ते काम तुमच्यासाठी नक्कीच सोपे होऊन जाते. जर मानसाने जर एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर तो काहीही करू शकतो. एक काळ असा होता जेव्हा लहान मुले गाताना किंवा नाचताना खूप कमी वेळा बघायला मिळायचे. पण सोशल मीडियाच्या (Social media) या युगात तुम्हाला अशी अनेक मुले पाहायला मिळतील. जी अत्यंत लहान एकदम भारी डान्स किंवा गाणे म्हणतात.
लहान चिमुकलीचा डान्स व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर एका चिमुरडीचा डान्स (Dance video) व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि म्हणाल की ही मुलगी इतक्या कमी वयात इतकी छान कशी काय डान्स करते? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी शास्त्रीय नृत्य करत आहे आणि ते खूप सुंदर करते आहे. तिचे हावभाव आणि तिच्या पायाची आणि हातांची शैली मनाला भावणारी आहे. खरं तर, ही मुलगी स्टेजवर नृत्य करणाऱ्या महिलेच्या शास्त्रीय नृत्याची कॉपी करत आहे. या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
How Cool ?
?️ shared pic.twitter.com/uC4iYvl52l
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) January 1, 2022
आयएएस अधिकारी डॉ. एम. वी. राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा खास व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘किती छान’. आतापर्यंत या व्हिडिओला 14 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1400 हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले आहे की, ‘खूप गोड’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘ही देवाची भेट आहे’ या व्हिडीओला लाईकचा पाऊस पडताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :
Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल
एका बॅचलर पार्टीमुळे मोडलं लग्न, पार्टीत असे काय झाले? वाचा सविस्तर