मास्क घालूनही चिमुकल्यानं खाल्लं लॉलीपॉप, ‘असा’ अफलातून जुगाड पाहिला नसेल! Video Viral
गेल्या दोन वर्षात, कोरोना व्हायरस(Corona Virus)नं धुमाकूळ घातला आहे. त्यानं संपूर्ण जगाला वेढलं. आजकाल मास्क(Mask)शी संबंधित एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो एका लहान मुलाचा आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा लॉलीपॉप खाण्यासाठी युक्ती करताना दिसत आहे.
Kid cute video : गेल्या दोन वर्षात, कोरोना व्हायरस(Corona Virus)नं धुमाकूळ घातला आहे. त्यानं संपूर्ण जगाला वेढलं. करोडो लोकांना संसर्ग झाला आणि लाखो लोकांचा बळी गेला. कोरोना येण्याआधी मास्क, सॅनिटायझर इत्यादींची माहिती असणारे किती लोक होते? लहान-मोठी मुलंही मास्क घालून फिरत आहेत, जेणेकरून कोरोनापासून वाचता येईल. सोशल मीडियावर नेहमीच सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले, लहान मुलांचे विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असले तरी आजकाल मास्क(Mask)शी संबंधित एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो एका लहान मुलाचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा लॉलीपॉप खाण्यासाठी अप्रतिम युक्ती करताना दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालावा लागत असल्यानं आणि लॉलीपॉपही खायचं असल्यानं मुलानं काय करावं? त्यामुळे त्यानं एक अतिशय अनोखा जुगाड बनवला.
लढवलं डोकं
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लॉलीपॉपच्या स्टीकनं मास्कच्या आतील बाजूस छिद्र केलं आणि आरामात मास्क घातला आणि आनंदानं लॉलीपॉप खाऊ लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मुलानं कसं डोकं लढवलं आहे, अशा मुलांना तर 21 तोफांची सलामी…
मास्क घालून, लॉलीपॉप खाल्ला
अशी ‘आश्चर्यकारक’ जुगाड करणारी मुलं क्वचितच पाहायला मिळतात, जी आपल्या बुद्धिमत्तेचा अशा प्रकारे वापर करतात की बघणारेही थक्क होतात. आता क्वचितच इतर कोणत्याही मुलानं विचार केला असेल, की मास्क घालून, लॉलीपॉप असे खाऊ शकतात.
ट्विटरवर शेअर
Vic या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या 15 सेकंदांच्या या व्हिडिओला लोक लाइक करत आहेत. एका यूझरनं लिहिलं, की खूप गोंडस बाळ.. मास्कशिवाय फिरणाऱ्या मोठ्यांसाठी तो आदर्श आहे’. सोशल मीडिया यूझर्स त्याचं कौतुक करत आहेत.
That’s how you suck on the lollipop while wearing a mask. Don’t question it or your against kids having lollopops…it’s Science.pic.twitter.com/w2FKIMtyOY
— Vic ?????? (@blessedbest7) November 19, 2020