Viral Video : ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’वर गातोय हा गोड मुलगा, बोबडे बोल ऐकून चिमुकल्याच्या प्रेमात पडाल!
लहानपणापासूनच मुलं असे काही कलागुण दाखवू लागतात, जे मोठ्यांना पण विचार करायला भाग पाडतात. विशेषतः गाणं (Song) आणि डान्स (Dance) याबद्दल काय बोलावं? एका हुशार मुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, त्याचं गाणं पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. त्याची गाणं गाण्याची स्टाइल, बोबडे बोल आपल्याला भावल्याशिवाय राहत नाहीत. आपण त्या चिमुरड्याचं कौतुक करत राहतो.
Kid Cute Video : आजकालची मुलं जन्मत:च हुशार असतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. तुम्हीही हे अनेकवेळा ऐकलं असेल. हे खरंही आहे. कारण आजकाल लहानपणापासूनच मुलं असे काही कलागुण दाखवू लागतात, जे मोठ्यांना पण विचार करायला भाग पाडतात. विशेषतः गाणं (Song) आणि डान्स (Dance) याबद्दल काय बोलावं? आजकाल लहान मुलंही गाताना आणि गुणगुणताना दिसतात. पूर्वी मुलांना कवितेच्या काही ओळीही आठवत नसत, तर आजकालच्या मुलांना संपूर्ण गाणं आठवतं. अशाच एका हुशार मुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, त्याचं गाणं पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. त्याची गाणं गाण्याची स्टाइल, बोबडे बोल आपल्याला भावल्याशिवाय राहत नाहीत. आपण त्या चिमुरड्याचं कौतुक करत राहतो.
गोड आवाज
व्हिडिओमध्ये एक मूल ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’ हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं आहे आणि ते खूप सुंदर गायलं आहे. त्याला गाण्याचे बोलही चांगले आठवतात आणि मुख्य म्हणजे त्याचा आवाज खूप गोड आहे, जो ऐकून कोणीही त्याचा चाहता बनतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मूल शाळेत जात आहे आणि एक महिला शिक्षिका त्याला गाण्यास सांगते आणि जोरात गाणं म्हणते, त्यानंतर मुलगाही गाणं सुरू करतो.
गाणं टाळण्याचाही करतं बहाणा
गाणं म्हणत असताना तो कधी कॅमेऱ्याकडे तर कधी शिक्षकाकडे पाहून गाणं म्हणतो. मग गाणं म्हणत असताना ते मूल अचानक थांबते आणि शिक्षिकेला सांगतं, की मॅडम, मला दातदुखी आहे आणि त्यानं तोंड उघडून दाखवलं. तो बहुधा गाणं टाळण्याचा बहाणा करत असेल, जे शिक्षक समजून घेतात आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि ‘गाओ ना’ म्हणतात. यानंतर मूल पुन्हा सुरू होतं.
स्कूल खुलने के बाद पहले दिन. pic.twitter.com/zydv5CfYkj
— Awanish Sharan (@AwanishSharan) January 29, 2022
ट्विटरवर शेअर
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, की शाळा उघडल्यानंतरचा पहिला दिवस. अवघ्या 59 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट करून मुलाच्या या अप्रतिम प्रतिभेचं कौतुकही केलं आहे.