Kid Skating video : वा..! शाब्बास..! अनेकवेळा पडला पण शेवटी जिंकलाच! पाहा, चिमुकल्याचं खेळातलं कौशल्य

Little Kid Skating video : आताची मुले खेळासोबतच आपलं अद्वितीय, अद्भुत असं कौशल्यही (Skills) दाखवतात. असाच एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी (Inspirational) व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा स्केटिंग (Skating) करण्याचा प्रयत्न करत आहे.

Kid Skating video : वा..! शाब्बास..! अनेकवेळा पडला पण शेवटी जिंकलाच! पाहा, चिमुकल्याचं खेळातलं कौशल्य
स्केटिंग करताना चिमुकला
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:14 PM

Little Kid Skating video : आजकालची मुलं ही आता मुलं राहिली नाहीत, तर मोठ्यांनाही ती मात देत आहेत. मुलांना फक्त खेळताना आपण पाहत आलो आहोत. पण आताची मुले खेळासोबतच आपलं अद्वितीय, अद्भुत असं कौशल्यही (Skills) दाखवतात. आजच्या मुलांमध्ये कलागुण भरलेले आहेत. अगदी लहान वयातच त्यांना इतका समजूतदारपणा आणि कौशल्य येते की ते काही शिकत असतील तर त्यात पूर्ण पारंगत झाल्यानंतरच स्वस्थ बसतात. पटकन हार मानत नाहीत. सोशल मीडियावर लहान मुलांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, त्यातील काही खूप मजेदार तर काही व्हिडिओ आश्चर्यकारक असतात. असाच एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी (Inspirational) व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चिमुरडा स्केटिंग (Skating) करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शेवटी यश येतच

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्केटिंग करताना मूल शिडीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे, पण पुन्हा पुन्हा तो पडतो. कधी सुरवातीला पडते तर कधी शिडीच्या मध्यभागी पडते. हे त्याच्यासोबत अनेकदा घडते, पण तो प्रयत्न करणे सोडत नाही. प्रयत्न करणारे पराभूत होत नाहीत, अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. हाच प्रत्यत या मुलामध्येही दिसून येते. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. पडूनही त्याची हिंमत खचत नाही आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले. स्केटिंग करताना तो यशस्वीपणे पायऱ्यांवरून खाली येतो.

ट्विटर हँडलवर शेअर

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अद्भुत व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, ‘कधीही हार मानू नका’. 34 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 79 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 15 हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने तर अशी कमेंट केली आहे, की जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत.

आणखी वाचा : 

…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

Video : काळ आला होता, पण.., काही मिनिटं वाचवणं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला पडलं महागात

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.