viral Video : हिरवे खारे वाटणे आवडीने खाताय का ? मग हा व्हिडीओ पाहाच..
अनेकदा वेळ जाण्यासाठी किंवा भूक भागविण्यासाठी प्रवासात अशा पदार्थांना खाल्ले जाते. आपल्याला कमी पैशात अशा वस्तू मिळत असल्याने आपण त्याची निर्मिती कशी केली जाते याच्या फंद्यात पडत नाही..
मुंबई : खारवलेले हिरवे वाटाणे लोक आवडीने खातात…अगदी लोकल ट्रेनमध्येही बसल्या बसल्या टाईमपाससाठी हिरवे वाटाणे लोक विकत घेऊन खात असतात. त्याने वेळही जातो आणि भूकही भागते त्यामुळे अशा हिरव्या वाटाण्यांना चांगलीच मागणी असते. परंतू या हिरव्या वाटाण्यांना तयार करण्याची रेसीपी आपण कधी पाहीलेली नसते. आज आपण या हिरव्या वाटाण्यांना कसे तयार करतात त्याची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसीपी पाहील्यास तुम्ही पुन्हा हिरव्या वाटाण्याच्या नादाला लागणार नाही.
अनेकदा आपण छोटी भूक भागविण्यासाठी चणे, शेंगदाणे किंवा हिरवे दिसणारे वाटाणे नक्कीच खात असतो. अनेकदा वेळ जाण्यासाठी किंवा भूक भागविण्यासाठी प्रवासात अशा खाद्य पदार्थांना खाल्ले जाते. आपल्याला कमी पैशात अशा वस्तू मिळत असल्याने आपण त्याची निर्मिती कशी केली जात असेल याच्या फंद्यात न पडता आपण त्या खाद्यवस्तू विकत घेऊन खात असतो. परंतू अशा कडक हिरव्या वाटाण्यांना कसे तयार केले जाते त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत आहे. तो आपण पाहिल्यास आपल्याला पुन्हा अशा वस्तू खाण्याची इच्छा होणार नाही.
येथे पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
या व्हिडीओत खारे वाटाण्यांना कारखान्यात तयार केले जात आहे. सलोनी बोथरा यांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. सलोनी या एक फुड ब्लॉगर आहेत, त्यांनी हा व्हिडीओ आसाममधील असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओत पांढऱ्या कडक वाटाण्यांना आधी साफ करताना दाखविले आहे. त्यानंतर त्याच चक्क हिरवा खाण्याचा कलर मिक्स केला जातो. त्यानंतर नीट सरमिसळ केल्यावर हे वाटाणे आपल्याला हिरवेगार दिसतात. एक कामगाराच्या हाताला देखील हिरवा रंग लागलेला दिसत आहे. त्यानंतर हा रंग सुकला की त्यांना तेलाच्या मोठ्या कढूईत डीप फ्राय केले जाते.
त्यानंतर त्यातून अतिरिक्त तेलाला वॉशिंग मशिनच्या ड्रायर प्रमाणे असलेल्या मशिनद्वारे बाहेर काढले जाते. नंतर तो पदार्थ विकला जातो. ही प्रक्रिया कुठल्याही प्रकारे हायजीन वाटत नाही. या व्हिडीओवर काही प्रतिक्रीया आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की आपण अख्खं आयुष्य हे वाटाणे खात आलो पण आपल्याला वाटायचे ते नैसर्गिक हिरवे असतात. तर अन्य एका युजरने म्हटले आहे की, या वाटाण्यांना रंगविले जाते ते बरोबर नाही. परंतू तळलेल्या वाटाण्यातून तेलाचा अंश काढतात ही चांगली बाब आहे.