AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना कार, ना बाईक, सामनावीर क्रिकेटपटूला ‘अमूल्य’ भेट, पाच लिटर पेट्रोल बक्षीस

सामनावीर पुरस्काराने गौरव झाल्याने सलाऊद्दिन अब्बासीला आयोजकांनी पाच लिटर पेट्रोल बक्षीस दिले. (Cricketer gets 5 liters Petrol )

ना कार, ना बाईक, सामनावीर क्रिकेटपटूला 'अमूल्य' भेट, पाच लिटर पेट्रोल बक्षीस
मध्य प्रदेशात सामनावीर क्रिकेटपटूला पाच लिटर पेट्रोल भेट
| Updated on: Mar 03, 2021 | 2:16 PM
Share

भोपाळ : क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्यांना कार-बाईकपासून वॉशिंग मशिन-मिक्सर अशी पारितोषिकं मिळत असल्याचं आपण पाहिलं आहे. ग्रामीण भागातील काही क्रीडा स्पर्धांमध्ये तर कोंबडी किंवा बोकडही विजेत्यांना दिलं जातं. परंतु बक्षीस म्हणून चक्क पेट्रोल दिल्याचं आपण कधी पाहिलं आहे का? (Madhya Pradesh Cricketer gets 5 liters Petrol after winning Man of the match award)

मध्य प्रदेशात क्रिकेट स्पर्धा

देशभरात इंधनाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कररचनेनुसार राज्या-राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वेगवेगळे आहेत. काही भागांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आंदोलनही केलं आहे. तर काही ठिकाणी उपरोधिक आणि कल्पक पद्धतीने इंधन दरवाढीचा निषेध केला जात आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असाच काहीसा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेत्याकडून कल्पक निषेध

भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो. केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा पर्याय काँग्रेस नेत्याने शोधून काढला. त्यासाठी भारतीयांचा श्वास असलेल्या क्रिकेटचं माध्यम निवडण्यात आलं. काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांनी भोपाळमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेच्या विजेत्यांना पैसे किंवा कार-बाईक नाही, तर याच कार-बाईकमध्ये टाकलं जाणारं पेट्रोल बक्षीस स्वरुपात देण्यात आलं. 28 फेब्रुवारीला झालेल्या या स्पर्धेचा फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

सलाऊद्दिन अब्बासी मॅन ऑफ दि मॅच

सनरायझर्स इलेव्हन (Sunrisers Eleven) आणि शागिर तारीक इलेव्हन (Shagir Tarik Eleven) या दोन संघांमध्ये क्रिकेट टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळवला गेला. सनरायझर्स इलेव्हन संघाने बाजी मारत ट्रॉफीवर नाव कोरलं. सनरायझर्स इलेव्हन संघाचा क्रिकेटपटू सलाऊद्दिन अब्बासी (Salauddin Abbasi) याने असामान्य खेळी खेळली. त्यामुळे अब्बासीचा सामनावीर (player of the match) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. (Madhya Pradesh Cricketer gets 5 liters Petrol after winning Man of the match award)

पाच लिटर पेट्रोल पारितोषिक

सामनावीर पुरस्काराने गौरव झाल्याने त्याला आयोजकांनी पाच लिटर पेट्रोल बक्षीस दिले. रोख इनाम देण्याऐवजी अब्बासीला ही अनोखी भेट देण्यात आली. हातात बॅट आणि पेट्रोलचा कॅन धरुन पंपासमोर उभ्या असलेल्या सलाऊद्दिन अब्बासीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी या क्रिएटिव्ह बक्षिसाचं, आयोजकांचं कौतुक केलं. तर मीम्स बनवण्यासाठी ट्रोलर्स आणि मीमर्सनाही खाद्य मिळालं.

संबंधित बातम्या :

इंदापुरात येऊन जेव्हा अझरुद्दीन म्हणतात… ‘मी पुन्हा येईन’

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

(Madhya Pradesh Cricketer gets 5 liters Petrol after winning Man of the match award)

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.