Video : रेल्वेतून उतरताना महिला प्रवाश्याचा तोल गेला, आरपीएफ कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे जीव वाचला, पाहा व्हीडिओ…
एक महिला प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तिचा अचानक तोल गेला. अन् ती खाली पडली. ती ट्रेनच्या खाली जाणार इतक्यात तिला बाहेर खेचण्यात आलं. आरपीएफ कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांनी या महिलेला खेचलं.
मुंबई : अनेकदा रेल्वे अपघाताचे व्हीडिओ समोर येतात. यात तिथे उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने प्राण वाचवण्याचं आपण अनेकदा बघतो. असाच एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) उज्जैन रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाश्याचा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या एका कॉन्स्टेबलने जीव वाचवला. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. ही महिला चालत्या ट्रेनमधीन प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तिचा अचानक तोल गेला. अन् ती खाली पडली. मग पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह (Mukesh Kushwaha) यांनी तिचा जीव वाचवला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक महिला प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तिचा अचानक तोल गेला. अन् ती खाली पडली. ती ट्रेनच्या खाली जाणार इतक्यात तिला बाहेर खेचण्यात आलं. आरपीएफ कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांनी या महिलेला खेचलं. लोक मुकेश कुशवाह यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांना त्यांच्या तत्पर कारवाईसाठी बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
“जल्दबाजी हो सकती है घातक”#उज्जैन– गलत ट्रैन में सवार हुई महिला,पता चलने पर जल्दबाजी में प्लेटफॉर्म पर चलती ट्रेन से उतरी, संतुलन बिगड़ने से महिला ट्रैन की चपेट में आने से बची,प्लेटफार्म पर मौजूद पुलिस कर्मी महेश कुशवाहा की सतर्कता से हादसा टला,#GRP @RailwaySeva#Ujjain #CCTV pic.twitter.com/943niH1usl
— vikas singh Chauhan (@vikassingh218) May 14, 2022
जीआरपीच्या पोलिस अधीक्षक निवेदिता गुप्ता म्हणाल्या, “मी तात्काळ कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांना 500 रुपयांचे बक्षीस दिले. मी GRP इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन यांना मुकेश कुशवाह यांना बक्षीस देण्यासाठी शिफारस पत्र लिहिण्यास सांगितलं आहे.” इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन पुढे म्हणाले की, “एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुले सकाळी साडेसहा वाजता सिहोरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्यासाठी स्टेशनवर आले होते. ही महिला चुकून जयपूर-नागपूर ट्रेनमध्ये चढली. तिने आपल्या चार आणि सहा वर्षांच्या मुलाला प्लॅटफॉर्मवर फेकून दिले आणि नंतर चालत्या ट्रेनमधून उडी मारली.सुदैवाने कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला आहे.”