AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र

तालुक्यात भरभरून मुली आहेत, मात्र एकही मुलगी पटत नसल्याची तरुणाला चिंता आहे. तक्रार करणारा तरुण खेडे गावातून असून राजुरा-गडचांदूर रोज जाणे-येणे करतो, परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही, असा मजकूर पत्रात आहे

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र
गर्लफ्रेण्डसाठी तरुणाचं आमदाराला पत्र
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 1:23 PM
Share

चंद्रपूर : मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, असं पठ्ठ्याने थेट आमदारांना पत्रात लिहिल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. तर आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.

तालुक्यात भरभरून मुली आहेत, मात्र एकही मुलगी पटत नसल्याची तरुणाला चिंता आहे. तक्रार करणारा तरुण खेडे गावातून असून राजुरा-गडचांदूर रोज जाणे-येणे करतो, परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही, असा मजकूर पत्रात आहे. मात्र हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे.

दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून जीव जळून राख होतो, असे पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना विधानसभा क्षेत्रातील मुलींना आपल्याला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नमुनेदार विनंती केली आहे.

पत्रात नेमकं काय?

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड महोदय, सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा

आपला प्रेमी भूषण जांबुवंत राठोड

आमदारांना पत्रच मिळालं नाही

दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल मात्र अशा पद्धतीने पत्रप्रपंच योग्य नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे.

पाहा पत्र :

संबंधित बातम्या :

पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी… ती सुद्धा फुकट! कर्मचाऱ्यांचं थेट महासंचालकांना पत्र, ऑडिओ क्लिप व्हायरल

मामा म्हणून जयंत पाटील कसे आहेत? भाच्चीनं लिहिलेलं पत्र महाराष्ट्रात व्हायरल, वाचा एका क्लिकवर

Chandrapur | चंद्रपुरात लग्नपत्रिकेत दारुच्या बाटलीचा व्हिडिओ व्हायरल

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.