पाच वर्ष जॉब करा, आयुष्यभर कमवा…पगार एक लाख ९० हजार…महाराष्ट्रातील जाहिरात व्हायरल

viral job advertisement | सध्या जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी संप पुकारला होता. त्याचा संदर्भात देत जाहिरातीत म्हटले आहे की, एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेन्शन योजना हमखास भेटणास आहे.

पाच वर्ष जॉब करा, आयुष्यभर कमवा...पगार एक लाख ९० हजार...महाराष्ट्रातील जाहिरात व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 12:33 PM

मुंबई, 17 डिसेंबर | सोशल मिडियावर एक जाहिरात व्हायरल होत आहे. एका दैनिकात आलेली ही जाहिरात आहे. 288 पदे भरण्याची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत गडगंज पगार आणि अनेक सुविधा मिळणार असल्याचे म्हटले आहे. पाच वर्षांसाठी ही नोकरी आहे. त्यानंतर आयुष्यभर पेन्शन आणि इतर सुविधा मिळणार आहे. या जाहिरातीची चांगली चर्चा होत आहे. परंतु जाहिरात कोणी दिली, त्या व्यक्ती किंवा संस्थेचे नाव यामध्ये नाही. परंतु आमदारांना मिळणारे फायदे आणि त्याच्यावर होणार खर्च या जाहिरातीत दिला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील ही अनोखी जाहिरात आहे. सोशल मीडियावर त्या जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर अनेक कॉमेंट दिल्या गेल्या आहेत.

काय आहे जाहिरात

महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत. आमदार म्हणून फक्त ५ वर्षे जॉब करा. त्यानंतर आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही. या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही. शिक्षण झाले नसेल तरी चालणार आहे. गुन्हे असले तरी चालणार आहे. नियमित काम केले नाही तर चालणार आहे. तसेच कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी चालणार आहे. १ लाख ९० हजार असणार आहे.

आमदारांना मिळालेल्या सुविधा दिल्या जाहिरातीत

  • आमदारांना मुंबईतील आमदार निवासात फ्लॅट मिळतो. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. म्हणजेच आमदारांना राहण्यासाठी मोफत निवास स्थान मिळेल असे जाहिरातीत म्हटले आहे.
  • आमदारांना विधिमंडळाच्या कँटीनमध्ये स्वस्तात फक्त २०/- रुपये जेवण मिळते.
  • आमदारांना फोनसाठी १५,०००/- भत्ता दिला जातो. त्याचा उल्लेख जाहिरातीत आहे. तसेच विनामूल्य ३ टेलिफोन मिळतात.
  • आमदारांना ५० हजार युनिट्स मोफत वीज दिले जाते. तसेच चार हजार लीटर पाणी कोणतेही पैसे न भरता देण्यात येणार आहे. कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विनामूल्य असणार आहेत. मोफत पेट्रोल मिळणार आहे.
  • रेल्वेत पहिल्या एसी (फस्ट एसी) अमर्यादीत प्रवास किमान ५ वर्षांसाठी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

पेन्शन योजनेचा उल्लेख

सध्या जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी संप पुकारला होता. त्याचा संदर्भात देत जाहिरातीत म्हटले आहे की, एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेन्शन योजना हमखास भेटणास आहे. प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी २००० अतिरिक्त पेन्शन आहे. कपडे धुवायला रोज ६०० रुपये मिळणार आहे. रोजचा भत्ता २००० रुपये आहे. फर्निचरसाठी एक लाख रुपये आहे. ऑफिस खर्च ६०,०००/- महिना तसेच इतर अनेक फायदे निवड २०२४ पासून सुरू होईल. आमदार व्हा. आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्ज्वल करा, असे जाहिरातीत म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.