Viral Video : हे अंडर वॉटर हॉटेल तुम्ही पाहीलंय काय ? आनंद महिंद्र म्हणाले मला त्यात डुलकीही लागणार नाही

आनंद महिंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर आतापर्यंत 6,415 लोकांनी हा व्हिडीओ लाईक्स केला आहे.

Viral Video :  हे अंडर वॉटर हॉटेल तुम्ही पाहीलंय काय ? आनंद महिंद्र म्हणाले मला त्यात डुलकीही लागणार नाही
anand mahindra Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 4:14 PM

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय राहणाऱ्या उद्योजक आनंद महिंद्र यांनी ट्वीटरवर एक आगाळ्या हॉटेलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या लक्झरी हॉटेल चक्क पाण्याच्या खाली बांधण्यात आले आहे. त्यांनी अशा पाण्याखाली हॉटेलात झोपण्याची कल्पना देखील भीतीदायक असल्याचे म्हणत अशा हॉटेला झोप काय मला डुलकीही लागणार नाही ! तर पाहूया हे कुठे आहे नेमकं हॉटेल त्याचे एका रात्रीचे भाडे किती आहे नेमकं पाहा…

कसे दिसते अंडर वॉटर हॉटेल ?

आनंद महिंद्र यांनी ज्या अंडर हॉटेलचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे ते जगातील पहीले असे हॉटेल आहे जे चक्क पाण्याखाली तयार करण्यात आले आहे. या लक्झरी हॉटेलात तुम्ही मरीन लाईफचा 180 डीग्रीने मजा लुटू शकता. या हॉटेलचे नाव मुराका ( the muraka hotel ) असं आहे. हे हॉटेल मालदीव बेटावर साल 2018 मध्ये उघडण्यात आले होते. हे हॉटेल समुद्राच्या सुमारे 16 फुट खाली तयार करण्यात आले आहे. यात रहाण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे.

महिंद्र कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी या हॉटेलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 30 सेंकदाच्या या व्हिडीओत या हॉटेलातील बेडरुमचा नजारा दिसत आहे. आजूबाजूला सर्वत्र पाणी आणि जलचर दिसत आहेत. निळ्या रंगातील महागडा हॉटेलाचा स्युट दिसत आहे. या आलिशान बेडरुमच्या भिंती काचेच्या आहेत. भिंतीच्या पल्याड मासे पोहताना दिसत आहे.

कॅप्शनमध्ये लिहीले काय पाहा 

महिंद्र ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी हा व्हिडीओ शेअर करताना या हॉटेलाचे सौदर्य आणि तेथील सुविधांचा उल्लेख केला आहे. परंतू या व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहीलेली कॅप्शन मजेदार लिहीली आहे. ते लिहीतात की, मुराका मालदीव येथील जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेलचा सुट. मला ही पोस्ट एकाने पाठवताना येथे विकेण्ड साजरा करणे आरामदायी असेल असे म्हटले होते. परंतू खरे सांगू मला येथे झोप काय डुलकीही लागणार नाही. मी येथील काचेच्या भिंतींना फटीतर नाहीत ना ? हे रात्रभर शोधत बसेन !

येथे पाहा आनंद महिंद्र यांचे ट्वीट –

एका रात्रीचे भाडे किती ?

आनंद महिंद्र यांनी शेअर केलेला अंडरवॉटर हॉटेलचा व्हिडीओ पाहून येथे रहाणे एक थ्रिलचा अनुभव देणारे असेल. परंतू या हॉटेलात एक रात्र काढण्याचे भाडे नेमके किती आहे हे पाहून तुम्हाला घाम फुटेल. येथे चार रात्रीचे पॅकेजसाठी तुम्हाला सुमारे दोन लाख डॉलर खर्च करावे लागतील. म्हणजेच 1.6 कोटी रुपये. या हिशेबाने एका रात्रीचे 40 लाख रुपये होतात.

दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहीला

आनंद महिंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर आतापर्यंत 6,415 लोकांनी हा व्हिडीओ लाईक्स केला आहे. आनंद महिंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ तसेच पोस्टना खूपच पाहीले जाते. ते नेहमीच प्रेरणादायी, मजेशीर, कल्पक पोस्ट करीत असतात. आनंद महिंद्र यांचे ट्वीटरवर 10.4 दशलक्ष फॉलोअर आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.