VIRAL : हातगाडीच्या वर कुत्र्यासाठी बांधलं छोटंसं ‘घर’, आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला फोटो
हे सोशल मीडिया(Social Media)चं युग आहे. आजकाल कोणतीही गोष्ट व्हायरल (Viral) व्हायला वेळ लागत नाही. फेसबुक(Facebook), ट्विटर (Twitter) आणि इन्स्टाग्राम (Instagram) अशा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडिओ (Video) आणि फोटो व्हायरल होत असतात.
हे सोशल मीडिया(Social Media)चं युग आहे. आजकाल कोणतीही गोष्ट व्हायरल (Viral) व्हायला वेळ लागत नाही. फेसबुक(Facebook), ट्विटर (Twitter) आणि इन्स्टाग्राम (Instagram) अशा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडिओ (Video) आणि फोटो व्हायरल होत असतात. विशेषत: प्राण्यांचे फोटो आणि व्हिडिओ. तुम्ही असे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक कुत्र्यांशी खेळतात, उड्या मारतात, त्यांच्याशी प्रेम करतात, परंतु सोशल मीडियावर आजकाल कुत्र्यांशी संबंधित असा एक फोटो व्हायरल होतोय, ज्याने लोकांची मनं जिंकली आहेत.
तुम्ही पाहिलं असेल, की लोक सहसा आपल्या पाळीव कुत्र्यांना राहण्यासाठी एक छोटेसं घर बांधतात, पण काही लोक असे असतात, की ज्यांच्याकडे स्वतःला राहण्यासाठी घरही नसतं, पण त्यांचं औदार्य इतकं असतं, की आपल्या हृदयात ते इतरांना जागा देत असतात. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये असचं एक दृश्यं दिसतंय.
हा जबरदस्त फोटो आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, की काही लोक इतके गरीब असतात की त्यांच्याकडे देण्यासाठी फक्त ‘पैसा’ असतो आणि काही मनानं खूप श्रीमंत असतात. लोकांना हा फोटो खूप आवडला. यावर कमेंट्सही आल्या आहेत. एका युझरनं लिहिलंय, ‘हृदय असावं, संपत्तीसाठी पैशाची गरज नाही, मनानं श्रीमंत व्यक्ती प्रत्येकासाठी दयाळू आणि मदत करणारी असते’.
कुछ लोग इतने गरीब होते हैं कि उनके पास देने के लिए सिर्फ “पैसे” होते हैं, और कुछ दिल के इतने अमीर होते हैं ?#ManWithGoldenHeart!#HelpChain, #Kindness #KindnessMatters pic.twitter.com/1bbeMrK0RZ
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 24, 2021
एक व्यक्ती हातगाडीवर अंधारात झोपतेय. तर त्यानं वर दुसरा ‘मजला’ बनवलाय. यामध्ये दोन कुत्री राहतात. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं त्या कुत्र्यांचं घर अतिशय नेत्रदीपक पद्धतीनं सजवलंय. त्यात एक दिवाही आहे आणि दोन्ही कुत्री आरामात बसलीत. हा व्हायरल झालेला फोटो म्हणजे दयाळूपणाचा कळस आहे, असा दयाभाव क्वचितच पाहायला मिळतो.