शेवटपर्यंत चारचाकी वाल्याने चोराचा केला पाठलाग, अतिशय रंजक व्हिडीओ!
तुमच्याही असे अनेक व्हिडीओ लक्षात असतील जे व्हायरल झालेले असतील. ज्यात दरोडेखोर येतात दरोडा टाकून निघून जातात. सोन्याच्या दुकानातली हातसफाई सुद्धा रंजक असते. हे व्हिडीओ कधी भयानक असतात तर कधी यात अशा पद्धतीने चोरी होते की त्यांना काय आपल्याला सुद्धा त्याचा तपास लागत नाही.
मुंबई: चोरीचे सीसीटीव्ही फुटेज कधी कधी खूप रंजक असतात. हे फुटेज अनेकदा व्हायरल होतात. तुमच्याही असे अनेक व्हिडीओ लक्षात असतील जे व्हायरल झालेले असतील. ज्यात दरोडेखोर येतात दरोडा टाकून निघून जातात. सोन्याच्या दुकानातली हातसफाई सुद्धा रंजक असते. हे व्हिडीओ कधी भयानक असतात तर कधी यात अशा पद्धतीने चोरी होते की त्यांना काय आपल्याला सुद्धा त्याचा तपास लागत नाही. या फुटेजमुळे चोर पकडायला देखील भरपूर मदत होते. पण लोकं मात्र या व्हायरल व्हिडिओंचा पुरेपूर आनंद घेतात. असाच एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ नीट बघा. एक महिला रस्त्यावरून जात असते. तिच्या हातात एक बॅग असते. एक माणूस दुचाकीवर येतो, खाली उतरतो, त्या महिलेच्या हातातून बॅग हिसकावून घेतो आणि लगेच त्याच्या दुचाकीवर बसतो. तो निघायच्या प्रयत्नांत असतानाच समोरून एक चारचाकी येते. तो चारचाकी वाला दुचाकीला धडक देतो. दुचाकी वाला खाली पडतो पण खाली पडून सुद्धा तो पुन्हा पळण्याच्या प्रयत्नांत असतो. चारचाकी वाला सुद्धा काय थांबत नाही तो त्याला धडक देतच राहतो आणि खाली पाडतच राहतो. हे असं बराच वेळ होत राहतं. शेवटी दुचाकी वाला बॅग सोडून तिथून पळून जातो. चारचाकी वाला त्याच्या मागे उलटी गाडी पळवतो. ती महिला ती बॅग उचलते आणि तिथून निघून जाते. हा व्हिडीओ अतिशय रंजक आहे.
Kalesh B/w A Chad Car Driver and a Thief pic.twitter.com/dDFaGk1z8l
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2023
चारचाकी वाला इतका चिवट असतो की तो त्या चोराचा शेवटपर्यंत पाठलाग सोडत नाही. दुचाकी वाला सुद्धा बॅग सोडायला तयार नसतो पण शेवटी त्याला तिथून पळून जावंच लागतं. Ghar Ke Kalesh नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला, जो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओवर खूप हसतायत. कमेंट बॉक्समध्ये लोकांनी खळखळून हसत-खेळत प्रतिक्रिया दिल्या.