Propose Video | शाळेतल्या Crush ला 63 वर्षानंतर केलं प्रपोज, आता करणार लग्न!
प्रेम कहाणीचे पण अनेक किस्से असतात, अनेक प्रकार असतात. कुणाचं शाळेतलं प्रेम असतं, कुणाचं कॉलेज मधलं. शाळा, कॉलेजमध्ये डेटिंग करून लोक विसरून जातात, आयुष्यात पुढे जातात. पण हे तरुण वयातलं प्रेम ते कधीही न विसरता येण्यासारखं असतं. अशीच एक प्रेम कहाणी व्हायरल होतेय.
मुंबई: प्रेम कुणाला होत नाही? प्रत्येकजण प्रेमात पडतो. पण खरी कसोटी असते ती प्रपोजलची. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला कधी आणि कसं सांगायचं? काय सांगायचं? याच प्रोसेसला म्हणतात प्रपोजल. हे करण्यासाठी फार हिंमत लागते. बरेचदा तर लोकं हे न करताच पुढे जातात. पण प्रपोजल ही फार लक्षात राहणारी गोष्ट आहे. वेळीच केलं नाही तर या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. आता विचार करा एखादं तुमचं प्रेम असेल आणि तुम्ही म्हातारे होईपर्यंत त्या व्यक्तीला ते सांगितलंच नाही तर? किती वाईट ना? या गोष्टीचा रिग्रेट करण्यापेक्षा एखादा विचार करेल मी सांगूनच टाकेल. प्रेम कहाणीचे पण अनेक किस्से असतात, अनेक प्रकार असतात. कुणाचं शाळेतलं प्रेम असतं, कुणाचं कॉलेज मधलं. शाळा, कॉलेजमध्ये डेटिंग करून लोक विसरून जातात, आयुष्यात पुढे जातात. पण हे तरुण वयातलं प्रेम ते कधीही न विसरता येण्यासारखं असतं. अशीच एक प्रेम कहाणी व्हायरल होतेय.
ही प्रेम कहाणी आहे थॉमस मैकमीकिनआणि नैन्सी गैम्बेलची. 78 वर्षांच्या थॉमस यांनी त्यांच्या हायस्कुल मध्ये असणाऱ्या नैन्सी गैम्बेल हिला प्रपोज केलं. नैन्सी त्यांची क्रश होती. 63 वर्षानंतर ते दोघे पुन्हा एकत्र आलेत आणि आता ते लग्न करणारेत. हायस्कुल मध्ये असताना थॉमस यांना नैन्सी फार आवडायची. नंतर त्या दोघांनी वेगवेगळ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, अधूनमधून ते भेटायचे देखील.
कॉलेज मध्ये असताना त्यांनी एकमेकांना डेट सुद्धा केलं, पार्टीलाही जायचे. पण नंतर काही वर्षांनी त्या दोघांची वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न झाली आणि ते दोघेही वेगळे झाले. आज जेव्हा ते 63 वर्षानंतर समोर आले थॉमसने नैन्सीला एकदम हटके प्रपोज केलंय. थॉमसची पत्नी आणि नैन्सीचा पती यांचं निधन झालंय. थॉमसने नैन्सीला एअरपोर्टवर प्रपोज केलं, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
View this post on Instagram
गेल्या आठवड्यात नैन्सी आली तेव्हा थॉमसने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं. यावेळी दोघांचे नातेवाईक उपस्थित होते. आता हे कपल लवकरच लग्न करण्याच्या विचारात आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. व्हिडिओला 77 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर युजर्सही यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले- “मला त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे.” दुसरा म्हणाला, “आशा कधीही सोडू नका.”