Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video
Balancing skill Stunt : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दररोज एकापेक्षा एक टॅलेंटेड (Talented) लोक पाहायला मिळतात. एक व्हिडिओ (video) लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती हँडलवर (Handle) उभी असताना सायकल (Cycle) चालवत आहे.
Balancing skill Stunt : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दररोज एकापेक्षा एक टॅलेंटेड (Talented) लोक पाहायला मिळतात. कधी कोणी प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतात, तर कधी डान्सिंग स्किल शो केस करताना दिसतात. तसे बघितले तर जगात टॅलेंटची कमतरता नाही. गरज आहे ती योग्य मार्ग आणि संधी मिळण्याची. काहींना संधी मिळते, तर काहींना यश मिळत नाही. मात्र, सोशल मीडियामुळे अनेक कलागुण समोर आले आहेत. काही जण तर रातोरात स्टार बनले आहेत. आजकाल असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. आजपर्यंत तुम्ही लोकांना अनेक युक्त्या करताना पाहिले असेल किंवा त्यांच्याबद्दल ऐकले असेल. पण, आजकाल असा एक व्हिडिओ (Video) लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती हँडलवर (Handle) उभी असताना सायकल (Cycle) चालवत आहे. त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने समतोल साधला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. हा सायकलवर स्टंट करतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अचंबित झाले आहेत. खरेच असे कोणी करू शकते का, असेही विचारत आहेत.
आश्चर्यकारक
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माणूस एका छोट्या, अरुंद रस्त्यावरून सायकल घेऊन येत आहे. त्यानंतर तो त्या सायकलच्या हँडलवर उभा राहतो आणि चालवतो. यादरम्यान तो सायकलच्या हँडलवर उभा राहून तोल साधण्याची जी करामत करतो, ती पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
View this post on Instagram
टायमिंग आणि जिम्नॅस्टिक्स उत्तम
सोशल मीडियावर लोक या जबरदस्त व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि तो सतत शेअरही करत आहेत. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा समतोल साधणारी करामत जो कोणी पाहत असेल तो त्याची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. एका यूझरने लिहिले आहे, की त्याचे टायमिंग आणि जिम्नॅस्टिक्स उत्तम आहे, पण यासाठी त्याला खूप सराव करावा लागला असेल. दुसर्या यूझरने लिहिले, की व्यक्तीचे संतुलन खरोखरच कौतुकास पात्र आहे.