दुसऱ्याच्या चुकीमुळे बनला कोट्यवधी रुपयांचा मालक; हाती लागला जॅकपॉट

एखादी लॉटरी जिंकावी आणि आपण अचानक कोट्यधीश व्हावं, असं स्वप्न सर्वसामान्यांनी कधी ना कधी पाहिलंच असेल. मनात ही सुप्त इच्छा असली तरी लॉटरीवर हल्ली कोणी पैसे खर्च करत नाही. पण एका व्यक्तीला क्लर्कच्या चुकीमुळे कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली आहे.

दुसऱ्याच्या चुकीमुळे बनला कोट्यवधी रुपयांचा मालक; हाती लागला जॅकपॉट
एका व्यक्तीला अचानक लागली लॉटरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 11:08 AM

मुंबई : 28 नोव्हेंबर 2023 | आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी श्रीमंत बनण्याचं स्वप्न नक्कीच पाहतो. पण फार क्वचित असे लोक असतात, जे खरंच श्रीमंत बनू शकतात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती येते. कठोर परिश्रमाच्या जोरावर एखादी व्यक्ती श्रीमंत बनू शकते, असं म्हणतात. पण या जगात असेही काही लोक आहेत, जे कोणतीच मेहनत न करता कोट्यधीश बनले आहेत. असं कसं शक्य आहे, हा प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर याचं उत्तर आहे लॉटरी. जगात असे बरेच लोक आहेत, जे लॉटरी जिंकून एका झटक्यात कोट्यधीश-अब्जाधीश बनले आहेत. सध्या अशीच एक व्यक्ती चर्चेत आली आहे, जी दुसऱ्या व्यक्तीच्या एका चुकीमुळे कोट्यवधींची मालक बनली आहे.

या व्यक्तीचं नाव आहे मायकल सोपेजटल (Michael Sopejstal). हा अमेरिकेतल्या इलिनोइस इथं राहणार आहे. नुकतीच त्याने एक बंपर लॉटरी जिंकली आहे. या लॉटरीतून त्याला 3 लाख 90 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 3.24 कोटी रुपये मिळाले आहेत. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय मायकलने सांगितलं की मिशिगनमध्ये त्यांच्या आवडीचं एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये ते दर आठवड्याला जेवायला जातात. त्याचवेळी ते रेस्टॉरंटजवळ असलेल्या एका दुकानातून लॉटरीचं तिकिट आवर्जून खरेदी करतात. सप्टेंबर महिन्यात मायकल यांनी दरवेळेप्रमाणे आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणं केलं आणि त्यानंतर लॉटरी खरेदी केली.

क्लर्कच्या चुकीमुळे बनले कोट्यधीश

रिपोर्टनुसार, मायकल यांनी लॉटरीचं तिकिट विकणाऱ्या क्लर्ककडून 10 वेगवेगळ्या ड्रॉ साठी तिकिटं मागितली होती. मात्र क्लर्ककडून एक चूक झाली आणि त्याने एकाच ड्रॉमधील 10 तिकिटं प्रिंट करून दिली. आपली चूक समजतात क्लर्क ती तिकिटं परत मागत होता, पण मायकल यांनी ती तिकिटं स्वत:कडे ठेवून घेतली. हाच क्षण मायकल यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. याच तिकिटांवर मायकल यांना 3 कोटी रुपयांपेक्षा अधिकची लॉटरी लागली. आपल्याला जॅकपॉट लागला आहे, हे त्यांना सुरुवातीला समजलंच नव्हतं. पण जेव्हा त्यांना त्याविषयी कळलं, तेव्हा लगेचच त्यांनी लॉटरी ऑफिसमध्ये जाऊन दावा केला.

हे सुद्धा वाचा

लॉटरी घेताना मायकल यांना ऑफर देण्यात आली होती की ते वर्षाला 25 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 21 लाख रुपये घेऊ शकतात किंवा सगळी रक्कम एकदाच स्वीकारू शकतात. त्यावर मायकल यांनी सगळी रक्कम एकाच वेळी घेण्याचं ठरवलं. मात्र जिंकलेल्या पैशांनी नेमकं काय करायचं, हे त्यांनी अद्याप ठरवलेलं नाही.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....