“तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!”, हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट चर्चेत

Dr Bhimrao Ambedkar 131st birth anniversary Celebration : अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर पोस्ट लिहित बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. तिच्या पोस्टमधील मजकुरामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. हेमांगीने बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितली आहे.

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!, हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट चर्चेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हेमांगी कवी
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:44 PM

मुंबई : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharatratn Dr. Babasaheb Ambedkar) यांची 131वी जयंती आहे. त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. राज्यात गेली दोन वर्ष कोरोनाचे संकट होतं. कोरोना संकटामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यावर मर्यादा होता. मात्र यंदा राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) लिहित बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. तिच्या पोस्टमधील मजकुरामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. हेमांगीने बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितली आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

हेमांगी कवीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय. या पोस्टमध्ये हेमांगीने बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितली आहे. “मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!”, असं हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कमेंट बॉक्स

हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. “आंबेडकर आपण सगळ्यांनी वाचले,पण ज्यांना समजले त्यांनी ना कधी आंबेडकरांना ‘जाती’त गुंतवलं,ना कधी स्वतः ‘जाती’त अडकून पडले”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. “कमी पडतीयेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हेमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही.जयभीम!”, असं एक नेटकरी म्हणाला आहे. या कमेंटवर हेमांगीने प्रतिक्रिया दिली आहे. “कुठल्याही राजकीय, कलाकार लोकांनी मनापासून काही लिहिलं की ते attention मिळवण्यासाठी असतं असं नसतं. कधी कधी Social media वरच्या काही likes आणि comments च्या हव्यासासाठी नसतं. आणि हा कधी कधी मधला जो फरक आहे ना तो महत्वाचा आहे. माझ्या मित्र यादीतल्या एका जरी माणसावर मी लिहिलेल्या गोष्टीने फरक पडला तरी खूप आहे. माझ्यावर सुद्धा असंच कुणाकुणाचं वाचून, पाहून परिणाम झाला. प्रत्येक वेळी judgemental होणं योग्य नाही! जय भीम”, असं हेमांगी म्हणाली आहे.

हेमांगी कवी ही मराठीतील संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती विविध विषयांवर आपली मतं मांडताना पाहायला मिळते. आजही तिने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोस्ट लिहीली आहे. जी चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा

WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे

National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.