Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…

क्रांती जेव्हा जेव्हा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत कानातल्या झुमक्यांबाबत काही ना काही किस्सा घडतच असतो. आताही तिने तिच्या कानातल्यांबाबतचा किस्सा शेअर केलाय.

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ...
क्रांती रेडकरImage Credit source: क्रांती रेडकर इन्स्टाग्राम
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:58 PM

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असते. तिच्या रिल्समधून ती लोकांचं मनोरंजन तर करतेच सोबतच वास्तवाची जाणिवही करून देते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या बिघडणाऱ्या गोष्टी ती इन्स्टाग्राम रील्सच्या (Instagram Reel) माध्यमातून लोकांसमोर मांडत असते. आताही तिने तिच्यासोबत वारंवार घडणारा किस्सा सांगितला आहे.क्रांती जेव्हा जेव्हा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत कानातल्या झुमक्यांबाबत (Earrings) काही ना काही किस्सा घडतच असतो. आताही तिने तिच्या कानातल्यांबाबतचा किस्सा शेअर केलाय. ज्यात पुन्हा एकदा तिच्या कानातल्यांनी तिच्यासोबत घात केल्याचं तिने सांगितलं आहे.

क्रांतीचा कानातल्या झुमक्यांचा किस्सा

क्रांती रेडकरने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केलाय. यात तिने तुटलेल्या कानातल्याचा एक भन्नाट किस्सा रंगवून सांगितला आहे. “माझ्यासोबत खरंच कानातल्यांचं कर्म वगैरे काहीतरी आहे. कारण एका लग्नात आणि एका कार्यक्रमात मी असं तुटलेलं कानातलं घालून फिरलेय. माझं खरंच मागच्या जन्मात कानातलं विकणाऱ्या सोबत माझं भांडण झालं असेल आणि तो म्हणाला असेल, मी तुला पुढच्या जन्मात बघून घेईल. नाही तुझं कानातलं भर कार्यक्रमात तुटलं तर नावाचा कानातले वाला नाही!, त्याचेच हे परिणाम असावेत. शंभर लोकांसोबत फोटो काढलेत. पण मला कुणीही सांगितलं नाही की तुझं कानातलं तुटलं आहे आणि आता कमेंट करून सांगतील की खरंतर मॅडम मी सांगणारच होते, पण… “, असं रील क्रांतीने शेअर केलंय. तिच्या या व्हीडिओवर अमृता खानविलकरने कमेंट केली आहे. “तुला बघून छान वाटलं”, असं अमृता म्हणाली आहे. तर “थँक्यू चंद्रा!”, असं क्रांती म्हणाली आहे.

क्रांतीने या आधीही असाच कानातल्याचा किस्सा सांगितला होता. तिने एक दिवशी दोन वेगवेगळे कानातले घातले होते. याचाही व्हीडिओ तिने शेअर केला होता.

क्रांतीने तिचे पती आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचा शॉपिंगचा किस्सा काही दिवसांआधी सांगितला होता. तिने इन्स्टाग्रामवर रील शेअर करत शॉपिंगवेळी समीर वानखेडे यांची रिअॅक्शन काय असते ते सांगितलं. “आम्ही एकत्र शॉपिंगला गेलो तर आम्हाला दोघांना लागणारी वस्तू जरी घ्यायची असेल तरी समीर खरेदीत फार रस घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात सगळं सेमचं तर आहे, तुला जे हवं घे”, असं क्रांतीने सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

CCTV Video: ना चावीची गरज, ना हातोड्याचा घाव! ओढणीनं शटर फोडून पाचही चोरट्यांची एकसाथ धाव

गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना

मेट्रो स्टेशनवरच महिलेला प्रसूती वेदना, CISF महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिलेव्हरी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.