AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जगदीश खेबुडकरांचे बोल, आशा भोसलेंचा आवाज आणि रश्मिकाची कंबर! आहे की नाही खतरा कॉम्बिनेशन?

Saami Saami Video on Marathi Song : अनेकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलंय. रश्मिकाची अदा आणि अल्लू अर्जुनच्या एक्शननं घायाळ झालेल्या चाहत्यांना सामी सामी गाण्याचं हे मराठमोळं वर्जन पाहून पोटभर हसवलंय.

Video | जगदीश खेबुडकरांचे बोल, आशा भोसलेंचा आवाज आणि रश्मिकाची कंबर! आहे की नाही खतरा कॉम्बिनेशन?
व्हायरल व्हिडीओनं सगळ्यांना खळखळून हसवलं
| Updated on: Feb 01, 2022 | 5:44 PM
Share

नॅशनल क्रश रश्मिका मंधनानं (National Crush Rashmika Mandhana) पुष्पा सिनेमातील सामी सामी (Saami Saami Song from Pusha The Rice) गाण्यावर जो काही अफलातून डान्स केलाय, त्याला तोड नाहीच! पण आपल्या मराठी पोरांच्या टॅलेंटलाही तोड नाही, बरं का! पुष्पा सिनेमात सामी सामी गाण्यावर रश्मिकाची कंबर जी काही थिरकली आहे, ते पाहून कुणालाही वाटेल, की कंबर कधीही लचकू शकते. पण तुम्हाला तर माहीत असेलच की मराठीतच तर कंबर लचकली, असं सांगणार एक गाणंच आहे. आता आपल्या मराठी पोरांना हे गाणं रश्मिकाचा डान्स बघून आठवलं नसतं, तरच नवल! मग काय? अशाच एका टॅलेंटेड पोरानं रश्मिका आणि अल्लू अर्जुनवर (South Star Allu Arjun) चित्रित झालेल्या या गाण्याचा व्हिडीओ उचलला. मराठीतचं नाचू किती नाचू किती कंबर लचकली गाणं त्याला खालू लावून दिलं… आणि मग तयार झाला एक भन्नाट व्हिडीओ!

खतरनाक कॉम्बिनेशन!

आशा भोसलेंच्या आवाजात रेकॉर्ड झालेल्या त्या गीताचे बोल होते,

नाचू किती नाचू किती कंबर लचकली! अहो, ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली बाई, बाई, जोडवी टचकली.. हा, नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली,

हे जगदीश खेबुकरांचे बोल.. आशा भोसलेंचा आवाज, राम कदम यांचं संगीत आणि रश्मिकाची कंबर, असं सगळं खतरनाक कॉम्बिनेशन एकाच व्हिडीओत पाहायला मिळालं, तर लोकं दचकणार नाहीतच तर काय? झालंही तेच…

आम्ही मीमकर व्हिडीओ या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय. तब्बल 37 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आतापर्यंत जवळपास आठ लाख लोक हा व्हिडीओ पाहून झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, काहींना तर हा व्हिडीओ खास मराठी गाण्यासाठीच शूट करण्यात आला होता की काय, असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कुणालाही पडेल!

एकदा बघाच!

सामी सामी गाण्याची क्रेझ पुष्पा सिनेमा रिलीज होऊन दीड महिना उलटूनही कमी झालेली नाही. अनेकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलंय. रश्मिकाची अदा आणि अल्लू अर्जुनच्या एक्शननं घायाळ झालेल्या चाहत्यांना सामी सामी गाण्याचं हे मराठमोळं वर्जन पाहून पोटभर हसवलंय.

संकेत कदम नावाच्या एका व्हिडीओ एडीटरनं हा व्हिडीओ एडीट केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी संकेत कदमचा ट्रेडमार्कही दिसून येतोय. आम्ही मीमकर व्हिडीओ या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

आता पत्नीचं तोंड बंद करा रिमोटनं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा अल्लु अर्जुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स, कमेंट करत अल्लु अर्जुन म्हणाला…

Saami Saami | Video | आजीबाई जोमात, आजीबाईंचे ठुमके पाहून रश्मिका आणि समांथाही कोमात! दादी नव्हे, ‘मौज कर दी!’

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.