VIDEO | पाठलाग करणाऱ्या मुलाला भर रस्त्यात फटके, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

मागे-मागे फिरणाऱ्या एका बदमाश मुलाला धडा शिकवतानाचा एका मुलीचा व्डिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये ही मुलगी पाठलाग करणाऱ्या मुलाला मारताना दिसत आहे. (meerut school girl beating staker boy viral video)

VIDEO | पाठलाग करणाऱ्या मुलाला भर रस्त्यात फटके, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल
मुलीने अशा प्रकारे मुलाला चोप दिला.
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 5:27 PM

मेरठ : देशात महिलांवरील वाढते अत्याचार हा सध्या गंभीर मुद्दा बनला आहे. महिलांवर बलात्कार, खून, छेड काढणे असे कित्येक प्रकार रोज देशात कुठे ना कुठेतरी घडतात. त्यामुळे महिलांनी त्यांचे संरक्षण स्वत: करायला हवे. तसेच समोर आलेल्या संकटाला हिमतीने तोंड द्यायला हवे, असं सामाजिक विचारवंत आणि पोलिसांकडून म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर मागे-मागे फिरणाऱ्या एका बदमाश मुलाला धडा शिकवतानाचा एका मुलीचा व्डिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये ही मुलगी पाठलाग करणाऱ्या मुलाला मारताना दिसत आहे. (Meerut school girl beating staker boy beating with stick video goes viral)

दोन मुलांकडून दोन मुलींचा पाठलाग

टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या रिपोर्टनुसार व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील आहे. या व्हिडीओमध्ये पाठलाग करणाऱ्या मुलाला एक मुलगी काठीने मारताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये हा मुलगा मुलीची माफी मागतानासुद्धा दिसत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ही घटना मेरठमधील एका बाजारातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेले दृश्य आणि मिळालेल्या माहितीनुसार दोन मुलं शाळेत जाणाऱ्या दोन मुलींचा पाठलाग करत होते. हे मुलं मागील कित्येक दिवसांपासून या मुलींना त्रास देत होते. शेवटी त्रास असह्य होऊन दोन मुलींमधल्या एका मुलीने धाडस दखवले. मुलीने पाठलाग करणाऱ्या मुलाला चांगलंच चोपलं आणि त्याला धडा शिकवला.

मुलीने पाठलाग करणाऱ्या मुलाला चांगलाच चोप दिला, पाहा व्हिडीओ :

लीचे चोप देताच मागितली माफी

मुलीने पाठलाग करत असलेल्या मुलाला चोप देणे सुरु केल्यावर बाजूचे लोकसुद्धा जमा झाले. या प्रकाराने गंभीर स्वरुप धारण केल्यानंतर पाठलाग करणाऱ्या दोन्ही मुलांनी पळ काढण्यास सुरुवात केली. मात्र, जमलेल्या लोकांनी या दोन्ही मुलांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर व्हिडीओतील मुलीने एका मुलाच्या कानखाली लगावली. कानाखाली पडताच या मुलाने नंतर माफी मागण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिससुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता मुलीने पोलिसांचा दांडा घेऊन थेट मुलाला चोप देणे सुरु केले. हा प्रकार घडल्यानंतर मेरठचे SP विनीत भटनागर यांनी पाठलाग करणाऱ्या मुलाला पकडल्याचं सांगितलं. तसेच मुलीने तक्रार दिल्यानंतर पाठलाग करणाऱ्या मुलांविरोधात एफआरआय दाखल केला जाईल असेही ते म्हणाले.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मुलीचे धाडस दाखवणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुलीच्या हिमतीची लोकांकडून प्रशंसा केली जात आहे. तसेच, अशा समाजकंटकांना चांगला धडा शिकवला पाहिजे असेही, सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

Support : झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत परिणीती चोप्रा, ट्विट करून म्हणाली…

VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले

VIDEO : ड्रायव्हर नव्हे रायडर…. या ट्रक ड्रायव्हरची करामत पाहाच

(Meerut school girl beating staker boy beating with stick video goes viral)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.