AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वधूने वराला हार घातला, आहेर घेऊन मित्र आले अन् वराला अक्षरश: कापरं भरलं…

लग्नाच्या चेष्टा मस्करीचे वातावरण या घटनेने एकदम गंभीर बनले...वराला तर चक्करच आली. वधूचा चेहरा कसानुसा झाला. दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी तर अगदी उसळून या मुलांच्या अंगावर धावली...

वधूने वराला हार घातला, आहेर घेऊन मित्र आले अन् वराला अक्षरश: कापरं भरलं...
| Updated on: Apr 19, 2025 | 6:22 PM
Share

लग्नाच्या मंगलाष्टकं म्हणणे सुरु होते..भटजींसोबत सर्वांनी शुभ मंगलम सावधान असा पुकारा केला आणि वधूने वराला हार घातला…दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या… तितक्याच आहेर घेऊन वराचे मित्र स्टेजवर आले…हा आहेर पाहून वराला अक्षरश: कापरं भरलं..वऱ्हाडी मंडळींमध्ये एकच गलका झाला….काय होते त्या आहेरात…

लग्न म्हटलं की मजामस्ती, नवरदेव आणि वधूच्या करवल्यांचा खरा मजामस्करीचा सोहळा असतो. पण एखादी मस्करीची कुस्करी कशी होते हे उत्तर प्रदेशातील एका विवाह सोहळ्यात पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशच्या हमीरपुर येथे लग्नसोहळ्याच वधूने हार वराला हार घातला. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वाजंत्रींना बजाओचा नारा झाला. आणि जो तो उठून नाचायला लागला. अशा प्रकारे सर्व आनंदाचा सोहळा सुरु असताना मात्र अचानक या आनंदावर विरजण पडले. नक्की काय झाले ते वाचा….

 वराला तर चक्करच आली…

आंतरपाठ दूर झाला आणि वधू-वराने एकमेकांना फुलांचे हार घातले. वधू आणि वरावर अक्षता बरसू लागल्या…लग्नातील तरुण मंडळी मुलींच्या डोक्यावर अक्षता पडतील असे नेम धरून अक्षता फेकू लागले. इतक्यात वराचे मित्र तोच तो चिरपरित निळा ड्रम घेऊन स्टेजवर चढले. हा ड्रम पाहून वराला तर चक्करच आली. तर वधूचा चेहरा कसानुसा झाला. दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी तर अगदी उसळून या मुलांच्या अंगावर धावली. आणि लग्नाच्या सर्व आनंद नाहीसा झाला…वराच्या मित्रांनी चेष्टा मस्करी करण्यासाठी हा निळा ड्रम आहेरात देण्याचा प्रयत्न केला, ही मस्करी मात्र त्यांच्या अंगाशी आली…आणि त्यांना भरपूर शिव्या पडल्या…

सोशल मीडियावर खूपच व्हायरल

ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. त्या बातमीवर सोशल मीडियावर देखील युजरच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. तर काहींनी याला मस्करी म्हणूनच घेतले. मेरठच्या सौरभ हत्याकांडानंतर ‘निळ्या प्लॅस्टीकच्या ड्रम’ची दहशत इतकी पसरली आहे की आता हा ‘ड्रम’ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतो. सौरभच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली. आणि या ड्रममध्ये त्याची बॉडी टाकून सिमेंटने तो भरुन टाकला होता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.