‘मी कोबरा आहे’, मिथून चक्रवर्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सोशल मीडियावर धुमाकूळ
मिथूनच्या कोबरा बाबतच्या वक्तव्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली (Memes on Mithun Chakraborty dialogue).
मुंबई : अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी रविवारी (7 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आयोजित सभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच “आमचा हक्क हिसकावला तर खबरदार, मी कोबरा आहे”, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून खिल्ली उडवली जात आहे (Memes on Mithun Chakraborty dialogue).
मिथूनच्या कोबरा बाबतच्या वक्तव्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. यापैकी जास्त प्रतिक्रिया या मिथून यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणारे आहेत. विशेष म्हणजे मिथूनच्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासातच ट्विटरवर कोबरा आणि मिथून चक्रवर्ती ट्रेंडमध्ये आले. “आपले अभिनेते कोबरा आहेत. हे आम्हाला आज माहिती पडलं”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या (Memes on Mithun Chakraborty dialogue).
काही युजर्सच्या प्रतिक्रिया पाहा :
One bite and TMC whoosh.
— सूरज ?? (@ursfriend_sk) March 7, 2021
Started spitting venom already
— sukumar moharana (@sukumar_m) March 7, 2021
— Aarohi Tripathy ?? (@aarohi_vns) March 7, 2021
मिथून चक्रवर्ती नेमकं काय म्हणाले होते?
“मी 18 वर्षाचा होतो. तेव्हापासून गरिबांना मदत करावी असं मला वाटत होतं. आज माझं हे स्वप्नही पूर्ण झालं आहे. जर कुणाचा अधिकार हिसकावून घेतला जात असेल तर मी त्यासाठी उभा राहिल. मी एक नंबरचा कोब्रा आहे. दंश मारला तर फोटो बनून जाल, अशा इशारा मिथून चक्रवर्ती यांनी दिला. “बंगाली असल्याचा मला अभिमान आहे. मी संपूर्णपणे कोब्रा आहे”, असंही ते म्हणाले.