Chandrayaan-3 | हा Video बघा, चंद्रावर महिंद्राच्या THAR ची लँडिंग, थँक्यू ISRO, नेमकं प्रकरण काय?

Chandrayaan-3 update | उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी X वर शेअर केलेला हा व्हिडिओ बघा. 'महिंद्राची थार चंद्रावर पोहोचली'. नेमका या व्हिडिओचा उद्देश काय आहे? त्यामागे अर्थ काय आहे?

Chandrayaan-3 | हा Video बघा, चंद्रावर महिंद्राच्या THAR ची लँडिंग,  थँक्यू  ISRO, नेमकं प्रकरण काय?
Mahindra Thar
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 1:55 PM

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव आहेत. फॉलोअर्समध्ये ते इंटरेस्टिंग, प्रेरणादायी आणि क्रिएटिव पोस्ट करण्यासाठी ओळखले जातात. महिंद्रा सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट करतात, त्याची चर्चा होतेच. सध्या त्यांची X वरची पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये महिंद्रा कंपनीची सर्वाधिक चर्चेत SUV Thar-E ला चंद्राच्या पुष्ठभागावर उतरताना दाखवलं आहे. हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया. उद्योगपती महिंद्रा यांनी अलीकडेच मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर एक नवीन व्हिडिओ शेअर केलाय. चांद्रयान 3 च्या यशासाठी ISRO ला शुभेच्छा देताना ते आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या आहेत. एकदिवस त्यांना थार SUV ला चंद्रावर धावताना पहायच आहे. लँडरमधून थार SUV चंद्राच्या पुष्ठभागावर उतरताना दाखवली आहे.

हा एक एनिमेटेड व्हिडिओ आहे. महिंद्रा एंड महिंद्रा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने हा व्हिडिओ बनवलाय. या जाहीरातीच्या माध्यमातून महिंद्रा कंपनीने लोकांना समजावण्याचा प्रयत्न केलाय. तो दिवस दूर नाहीय, जेव्हा लोक चंद्रावर रहायला सुरुवात करतील. पृथ्वीप्रमाणे तिथे सुद्धा कारस धावू लागतील. 10 सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत 7 लाख व्यूज आले आहेत. 21 हजारपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट लाइक केलीय. त्याशिवाय ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जातेय. त्यावर कमेंट येत आहेत. ISRO आणि महिंद्र सर काहीही करु शकतात, असं एका युजरने म्हटलं आहे. महिंद्राची थार चंद्रावर पोहोचली, असं दुसऱ्या युजरने म्हटलय. तिसऱ्याने म्हटलय, बेट लावा, महिंद्राची थार चंद्रावरच्या ऊबडखाबड रस्त्यावर सुद्धा मस्क्यासारखी पळेल.

होप एक्सपीरिमेंट यशस्वी

दरम्यान इस्रोने पुन्हा एकदा कमाल केलीय. इस्रोला दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आलं. विक्रम लँडरवर होप एक्सपीरिमेंट यशस्वी ठरली. “कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरच इंजिन चालू झालं. जमिनीपासून 40 सेमी वर हा लँडर गेला. तिथून पुन्हा 30-40 सेमी अंतरावर जाऊन लँडिंग केलं” असं ISRO ने सांगितलं. “भविष्यात लँडरला परत पृथ्वीवर आणणं आणि मानवी मिशनसाठी ट्रायल करणं हा या प्रयोगामागे उद्देश होता” असं इस्रोकडून सांगण्यात आलं.

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर….
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप.
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन.
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी.
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.