Video | याला माकड म्हणावे की स्पायडरमॅन ? भिंतीवर चढताना नेमकं काय केलं ते एकदा पाहाच !
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे. हे माकड भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रयत्न करुनही माकडाला भिंतीवर चढता येत नाहीये. मात्र हिम्मत न हारता माकडाने आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या एका माकडाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतील माकड स्पायडर मॅनप्रमाणे भिंतीवर चढले आहे. (monkey climbing on wall funny video went viral on social media)
माकडाला भिंतीवर चढता येत नाहीये
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे. हे माकड भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रयत्न करुनही माकडाला भिंतीवर चढता येत नाहीये. मात्र हिम्मत न हारता माकडाने आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.
खाचांना पकडून माकड भिंतीवर चढले
शेवटी अथक प्रयत्न करुन व्हिडीओतील माकड भिंतीवर चढून दुसरीकडे जाण्यात यशस्वी ठरले आहे. सुरुवातीला एक मोठी झेप घेऊन माकड भिंतीवर चढले आहे. नंतर भिंतीवर असलेल्या खाचांना पकडून माकड समोर गेले आहे. तसेच भिंतीवर चढून माकडाने पुन्हा एकदा खाली उडी मारली आहे. माकडाची ही करामत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर videolucu.funny या अकाऊंटवर शेअर करण्यात आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
इतर बातम्या :
Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स
फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?
जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’
(monkey climbing on wall funny video went viral on social media)