माकड बघा कसं Reels बघतंय! व्हिडीओ व्हायरल
माकडे नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. आता यासंबंधीची एक क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये माकडं माणसांकडून मोबाईल स्क्रॉलिंगची कला कशी शिकली आहेत आणि आपल्यासारख्या इतर लोकांप्रमाणेच आरामात फोन चालवण्यात माहिर झाली आहेत.
मुंबई: प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ खूप गोंडस असतात. व्हिडीओमध्ये अनेकदा प्राण्यांचा निरागसपणा दिसून येतो. लहान मुलेच काय प्राणी सुद्धा माणसाला कॉपी करतात. जे माणूस करणारा ते ते प्राणी करणार. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुत्रा, कुत्रा तर माणसाच्या सोबत राहून राहून माणसाप्रमाणेच वागायला लागलाय. हा व्हिडीओ जरा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड आहे. हे माकड अगदी माणसाप्रमाणेच फोन खेळतंय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला कुणीतरी नक्कीच आठवेल.
स्मार्टफोनची क्रेझ सर्वांमध्ये आहे. लहान मुले असोत वा प्रौढ, प्रत्येकजण याला बळी पडतो. फक्त आपण माणसेच याला बळी पडतो असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात कारण प्राण्यांनाही याची क्रेझ आहे. माकडे नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. आता यासंबंधीची एक क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये माकडं माणसांकडून मोबाईल स्क्रॉलिंगची कला कशी शिकली आहेत आणि आपल्यासारख्या इतर लोकांप्रमाणेच आरामात फोन चालवण्यात माहिर झाली आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड बेडवर आरामात पडून माणसांप्रमाणे रिल्स स्क्रोल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे, चार लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “हे पाहून समजलं की माकडं खरंच आमचे पूर्वज आहेत. आणखी एकाने लिहिले की, “असे दिसते की त्यांना टच स्क्रीन कसे कार्य करते हे माहित आहे.”