झाडावर चढणारी गाडी! हे तंत्रज्ञान नाही पाहिलं तर काय पाहिलं?
एक क्लिप शेअर केली आहे जी जुगाड तंत्रज्ञान नाही हे आवर्जून त्यांनी सांगितलंय. हा व्हिडीओ तितकाच मनोरंजक आहे - एक स्कूटर जी झाडावर चढू शकते. ते काय आहे हे जाणून घेण्यात आपल्याला स्वारस्य आहे अशी आमची खात्री आहे.

जुगाडचा विचार केला तर भारतीय किती अप्रतिम आहेत हे सांगण्याची गरज नाही. उद्योगपती हर्ष गोएंका हे व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यासाठी ओळखले जातात ज्यात अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असतात. जे बघून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल असे हे व्हिडीओ असतात. मात्र, यावेळी हर्ष गोएंका यांनी एक क्लिप शेअर केली आहे जी जुगाड तंत्रज्ञान नाही हे आवर्जून त्यांनी सांगितलंय. हा व्हिडीओ तितकाच मनोरंजक आहे – एक स्कूटर जी झाडावर चढू शकते. ते काय आहे हे जाणून घेण्यात आपल्याला स्वारस्य आहे अशी आमची खात्री आहे. ते काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
झाडावर चढण्याचा भन्नाट मार्ग झाला व्हायरल
ग्रामीण भागात लोक झाडांवर चढून नारळ किंवा खजूर तोडण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण या अनोख्या यंत्राद्वारे झाडांवर चढण्याची अवघड प्रक्रिया आता अतिशय सोपी वाटणार आहे. बिझनेसमन हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झाडाला जोडलेल्या सायकलसारख्या मशीनवर बसलेला दिसत आहे. या मोटार वाहनाच्या माध्यमातून लोक सहजपणे स्वत:ला वर नेऊ शकतात. हे यंत्र आपल्याला झाडाच्यावर घेऊन जाते. हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोएंका यांनी लिहिले की, “इंटरेस्टिंग इनोव्हेशन – मी याला ‘जुगाड’ म्हणणार नाही!”.
Interesting innovation – this I won’t call ‘jugaad’!pic.twitter.com/P62k1qNpAX
— Harsh Goenka (@hvgoenka) March 22, 2023
या ‘स्कूटर’मुळे तुम्ही 30 सेकंदात 275 फूट (84 मीटर) उंच झाडावर चढू शकता. झाडावर चढणारी ही ‘स्कूटर’ कुठल्याही सरळ किंवा किंचित वळलेल्या झाडावर किंवा खांबावर जाऊ शकते. ही स्कुटर ऑपरेटरला पटकन चढण्याची परवानगी देते. हा व्हिडिओ 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनोखे तंत्रज्ञान पाहून लोक थक्क झाले आणि ज्यांनी हा शोध लावला त्या व्यक्तीचे कौतुक केले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण तो आपल्या अकाऊंटवर ही शेअर करत आहेत.