कोरोनापासून बचावासाठी मास्क गरजेचा, मुंबई पोलिसांची समजावण्याची पद्धत सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई पोलिसांची अशीच एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलीय. मुंबई पोलिस आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नागरिकांना महत्वाचा सल्लाही देत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या या पोस्ट उपयुक्तही ठरत आहेत.
मुंबई : कोरोना संकटाच्या काळात मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं असेल. मुंबई पोलिसांची अशीच एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलीय. मुंबई पोलिस आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नागरिकांना महत्वाचा सल्लाही देत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या या पोस्ट उपयुक्तही ठरत आहेत. (Mumbai Police’s Instagram post advising to use a mask to protect against corona goes viral)
मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी पाहायला मिळतेय. यात तो मुलगा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुलगी मात्र त्या मुलाशी बोलण्यास साफ नकार देते. खरं तर ती मुलगी मुलाशी बोलण्यास नकार देते कारण त्या मुलाने तोंडाला मास्क लावलेला नसतो आणि तो मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुलगी त्या मुलाला सांगते की कोरोना संकट कायम आहे. तू मला बोलण्याचा प्रयत्न करु नको.
View this post on Instagram
मुंबई पोलिसांनी या पोस्टच्या माध्यमातून हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे की, जोपर्यंत तुम्ही तोंडाला मास्क लावला आहे तोपर्यंत सर्वकाही सुरळीत आहे. मात्र, तुम्ही मास्क काढल्यास समोरील व्यक्तीचे हावभाव बदलतात. अशावेळी तुम्ही तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे. जेणेकरुन समोरिल व्यक्तीला तुमच्याशी बोलताना संकोच वाटू नये. मुंबई पोलिसांच्या या पोस्टवर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही देत आहेत. मुंबई पोलिसांकडून सुरु असलेली ही जागरुकता मोहीम कौतुकास पात्र ठरत आहे.
अशाप्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या पोस्ट पाहून यूजर्सही मुबई पोलिसांचं कौतुक करत आहेत. त्यामुळे मास्क वापरण्याचा सल्ला देणारी मुंबई पोलिसांची ही पोस्टदेखील चांगलीच चर्चिली जात आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या पोस्टद्वारे नागरिकांना सुरक्षा आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडिया युजर्सनाही मुंबई पोलिसांच्या अशाप्रकारच्या पोस्ट इतक्या आवडतात की ते शेअर केल्याशिवाय राहत नाहीत.
Maharashtra Metro Recruitment 2021: महा मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगारhttps://t.co/Cd4Ot6Zx1l#Mahametro | #MaharashtraMetro | #NagpurMetro | #Career
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या :
Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ
Mumbai Police’s Instagram post advising to use a mask to protect against corona goes viral