Viral video : ‘जिवंत डायनासोर’ म्हणून परिचित असलेला ‘हा’ प्राणी आहे तरी कसा? वाचा सविस्तर
Mysterious creature : कॅनेडियन मच्छिमार (Canadian fisherman) यवेस बिसनने (Yves Bisson) अलीकडेच ब्रिटिश कोलंबियामध्ये (Colombia) एका प्राण्याला पकडताना असे कृत्य केले आहे, जे आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Mysterious creature : कॅनेडियन मच्छिमार (Canadian fisherman) यवेस बिसनने (Yves Bisson) अलीकडेच ब्रिटिश कोलंबियामध्ये (Colombia) एका प्राण्याला पकडताना असे कृत्य केले आहे, जे आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्याने त्या विचित्र प्राण्याला पकडले आणि त्याला पाण्याखाली जाण्यास मदत केली. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक वेगळाच अनुभव मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यवेस यांना साडे दहा फूट लांबीचा स्टर्जन आढळला, ज्याला ‘जिवंत डायनासोर’ असेही म्हटले जाते. मच्छीमार म्हणाला, की तो आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात मोठ्या स्टर्जनपैकी एक होता. व्हिडिओमध्ये तो 250 किलो वजनाचा मासा आपल्या हातांनी पकडतो. आता तो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो स्टर्जनचे डोके कॅमेऱ्याकडे नेण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
करण्यात आले मोजमाप
‘हे बघा, हा मासा साडेदहा फूट आहे, कदाचित 500 किंवा 600 पौंड आहे,’ असे व्हिडिओमध्ये ऐकू येते. मिळालेल्या माहितीनुसार, हा मासा पकडून त्याचे मोजमाप करण्यात आले. स्टर्जनला पकडल्यानंतर, त्याला RFID चिपने टॅग केले गेले आणि नंतर सोडले गेले. असा स्टर्जन यापूर्वी कधीच पकडला गेला नव्हता, असे त्याने सांगितले.
250 kg sturgeon caught in Canada
The giant was captured in British Columbia, measured, RFID-tagged, and released. According to experts, the fish is over 100 years old pic.twitter.com/S8JrANxMM9
— rajiv (@rajbindas86) March 18, 2022
स्टर्जन हा अमेरिकेचा नामशेष डायनासोर
यवेस बिसन हे कॅनडाच्या फ्रेझर नदीत राहणाऱ्या स्टर्जन माशांचे तज्ज्ञ आहेत. स्टर्जनला त्यांचे ‘जिवंत डायनासोर’ हे टोपणनाव त्यांच्या जुरासिक-युगाच्या उत्पत्तीवरून मिळाले. स्टर्जन हा अमेरिकेचा नामशेष डायनासोर होता. एका शतकाहून अधिक काळानंतर, अशा माशांची प्रचंड लोकसंख्या अमेरिकन जलमार्गात अस्तित्वात असल्याची चिन्हे दिसत आहेत.