Video : NDA cadetsची ‘अशी’ही कलाकारी; गुणी कलावंतांना पाहून यूझर्सही म्हणतायत, ‘एका खोलीत इतकी प्रतिभा!
एक व्हिडिओ समोर आला आहे. जो नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी सैनिक सुंदर गाणं (Song) गात आहेत त्याचा, जो सगळ्यांची मनं जिंकतोय. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट एकत्र बसून 'छप टिळक सब छिनी' गातोय. वातावरण सेट आहे.
National Defence Academy Video : नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) ही शिस्त, काटेकोरपणा आणि नियम आणि नियमांसाठी ओळखली जाते. तिथलं वातावरण खूप कडक असायला हवं, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तसं नाही. इथंही मौजमजेचं वातावरण असून इथं येणारी मुलंही मौजमस्ती करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून असा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी सैनिक अतिशय सुंदर गाणं (Song) गात आहेत त्याचा, जो सगळ्यांची मनं जिंकतोय. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट एकत्र बसून ‘छप टिळक सब छिनी’ गातोय. म्हणजे वातावरण पूर्णपणे सेट झालं आहे. क्लिपमध्ये एक तरूण गिटार वाजवत असल्याचं दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रत्येकाला आपले दिवस आठवतील, प्रत्येकजण आपल्या जुन्या मित्रांसोबत एकत्र जमून मजामस्ती करत असे.
ट्विटरवर शेअर
@SirishaRao17 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं, “नॅशनल डिफेन्स अकादमीच्या स्क्वाड्रन अँटे रूममध्ये एक संध्याकाळ. मला वाटतं की बटालियन मनोरंजनासाठी सराव करत आहे. लव्हली. या व्हिडिओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यात वाढच होतेय.
कमेंट्स गोड संदेशांच्या
विद्यार्थी सैनिकाच्या गायन कौशल्यानं नेटिझन्स खूप प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी कमेंट विभाग गोड संदेशांनी भरला आहे. एका यूझरनं म्हटलं, ‘यापैकी काही तरूण आजपासून 35 वर्षांनंतर संरक्षण सेवांचे प्रमुख/कमांडर बनतील आणि काहींना आपल्या देशाचं रक्षण करताना सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळेल.’ तर दुसर्या यूझरनं लिहिलं, “गायक, गिटार वादक आणि ढोलकी वाजवणाऱ्यांना चिअर्स. ‘एका खोलीत इतकी प्रतिभा! याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
An evening in the Squadron Ante Room at National Defence Academy.. Practicing for Batallion Entertainment, I guess 🙂
Lovely ☺️ pic.twitter.com/WqbcNPY1TF
— SirishaRao (@SirishaRao17) February 2, 2022