Nepal Plane Crash: विमान क्रॅश व्हायच्या आधी एअर होस्टेसने बनवला होता हा सुंदर व्हिडीओ, आता होतोय व्हायरल!
ओसिन अलीने कधी कल्पनाही केली नसेल की असा एक दिवस येईल जेव्हा तिला विमान अपघातात या जगाचा निरोप घ्यावा लागेल. या व्हिडिओमध्ये ती विमानात एकटीच दिसत आहे.
नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेने लोकांना धक्का दिला. लँडिंगपूर्वी कोसळलेल्या विमानात 68 प्रवाशांसह एकूण 72 जण होते. या विमान दुर्घटनेत एअर होस्टेस ओसिन अलीचाही मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर टिकटॉकवर तिचा एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ तिने विमानातच बनवला होता. विमानाच्या आत हसतानाचा व्हिडिओ बनवत असताना ओसिन अलीने कधी कल्पनाही केली नसेल की असा एक दिवस येईल जेव्हा तिला विमान अपघातात या जगाचा निरोप घ्यावा लागेल. या व्हिडिओमध्ये ती विमानात एकटीच दिसत आहे.
येती एअरलाइन्सच्या एटीआर-72 या विमानाने काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण केले. विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. हे विमान पोखरा येथे पोहोचलेच होते, सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी लँडिंगच्या अवघ्या 10 सेकंद आधी ते कोसळले. नेपाळी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरा मधील जुनं डोमेस्टिक एयरपोर्ट आणि इंटरनॅशनल एयरपोर्ट दरम्यान हा अपघात झाला.
नेपाळच्या प्रसिद्ध लोकगायिका नीरा चंत्याल यांचाही या अपघातात मृत्यू झाला. नीरा पोखरा मध्ये आयोजित एक कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी जात होत्या.
विमान दुर्घटनेनंतर नेपाळ सरकारने कॅबिनेटची बैठक बोलावली होती. त्यानंतर एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्यात आला. त्याचबरोबर या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने पाच सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.
या अपघाताबाबत नेपाळ विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, विमान अपघात हवामानामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे. विमानाच्या पायलटने लँडिंगसाठी एटीसीकडून परवानगी घेतल्याचेही विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पोखरा एटीसीवरून लँडिंगसाठी ओके असेही सांगण्यात आले होते.
नेपाल विमान हादसे से पहले एयर होस्टेस ने बनाया था ये प्यारा वीडियो.. क्या पता था अगले ही पल उजड़ जाएगी हंसती-खेलती जिंदगी. #Airport pic.twitter.com/BGzExk04Qd
— Govinda Prajapati (@govinda__p) January 15, 2023
नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगपूर्वीच विमानात आगीच्या ज्वाळा दिसल्या होत्या. त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही. दरम्यान, येती एअरलाइन्सने संध्याकाळी अधिकृत निवेदन जारी करत 68 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.